भाजपच्या अतुल सावे यांच्या रोमहर्षक हॅट्ट्रिकची 'ही' आहेत कारणे; 'MIM'ची तिसऱ्यांदा हार
By विकास राऊत | Published: November 24, 2024 11:58 AM2024-11-24T11:58:51+5:302024-11-24T12:02:28+5:30
औरंगाबाद पूर्व मतदारसंघ; २१६१ मतांनी विजय केला साकार; इम्तियाज जलील, लहू शेवाळे, गफ्फार कादरी यांचा पराभव
छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून भाजपचे उमेदवार अतुल सावे यांची २४व्या फेरीअखेर रोमहर्षक हॅट्ट्रिक झाली. २३ व्या फेरीपर्यंत अतिशय काटे की टक्कर अशी लढत एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी सावे यांना दिली. २१६१ मतांनी सावे यांनी गड राखला. ९२ हजार ४७१ ईव्हीएमवर, तर ८०३ पोस्टल मतांसह सावे यांना ९३ हजार २८४ मते मिळाली, तर जलील यांना ९० हजार ६९४ ईव्हीएमवर, तर ४१९ पोस्टल मतांसह ९१ हजार ११३ मते मिळाली, तर काँग्रेसचे उमेदवार लहू शेवाळे यांना १२ हजार ५६८ मतांवर समाधान मानावे लागले. वंचित बहुजन आघाडीचे अफसर खान यांनी ६५०७ व समाजवादी पार्टीचे उमेदवार डॉ. गफ्फार कादरी यांनी घेतलेल्या ५९४३ मतांसह अपक्ष उमेदवारांनी घेतलेल्या मतांनी पूर्व मतदारसंघाच्या निकालाची उत्कंठता प्रत्येक फेरीला वाढविली.
जालना रोडवरील एसएफएस शाळेतील केंद्रात सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू झाली. निवडणूक अधिकारी चेतन गिरासे, तहसीलदार रमेश मुंदलोड यांच्या टीमने साडेआठ तास परिश्रम घेत १५३४ पोस्टल आणि २ लाख १६ हजार ५८० ईव्हीएमची मते मोजली. मतमोजणीच्या एकूण २४ फेऱ्या होत्या.
जिल्ह्यात सर्वाधिक २९ उमेदवार या मतदारसंघात होते. त्यातील १६ उमेदवार मुस्लिम होते. मत विभाजनाचे गणित शेवटच्या टप्प्यावर जुळल्यामुळे सावे यांचा २१६१ मतांनी निसटता विजय झाला. २०१४, २०१९ च्या तुलनेत सावे यांना सर्वांत कमी मतांनी विजय मिळाला, तर एमआयएमची या मतदारसंघात पराभवाची हॅट्ट्रिक झाली.
मिळालेली मते: ९३ हजार २७४
सावे यांच्या विजयाची तीन कारणे
- मराठेत्तर मतदारांनी सावे यांची विजयाची वाट सुकर केली.
- मुस्लिम उमेदवारांमध्ये मत विभागणी झाल्यामुळे फायदा.
- विजयासाठी साम, दाम, दंड, भेदाची नीती वापरावी लागली.
जलील यांच्या पराभवाची तीन कारणे
- मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण रोखण्यासाठी प्रयत्न केले नाहीत.
- मराठा व इतर मतदान मिळाले, परंतु गेमचेंजर झाले नाही.
- दलित मतदारांचा विश्वास जिंकता न आल्याने फटका बसला.
मतदारसंघातील उमेदवारांना मिळालेली मते
उमेदवाराचे नाव... ......पक्ष...................मिळालेली मते
अतुल सावे...................भाजप ................९३२७४
इम्तियाज जलील..........एमआयएम.............९१११३
लहू शेवाळे.................काँग्रेस.............१२५६८
शीतल बनसोडे............बसपा................१२३३
अफसर खान...........वंचित बहुजन आघाडी.........६५०७
अब्दुल गफ्फार कादरी.....समाजवादी पार्टी......५९४३
इसा यासीन....... एआयएमएआयएएम...........५६७
जयप्रकार घोरपडे ....... पीडब्ल्यूपीआय.........१५५
योगेश सुरडकर ..........लोकराज्य पार्टी.........१५७
रविकिरण पगारे .......व्हीसीके...........५७
राहुल साबळे ........... एएसपी (कांशीराम)........३६९
साहेबखान यासीनखान ........ बीआरएसपी..........११३
शकिला नाजेखान पठाण .......अपक्ष.................१४२
तसनीम बानो .......... अपक्ष................६१
दैवशाली झिने .......... अपक्ष...........१८८
नीता भालेराव ........... अपक्ष..........४७२
पाशू शेख ............ अपक्ष.............४९५
मधुकर त्रिभुवन ........ अपक्ष........१०१
मोहम्मद मोहसीन ......... अपक्ष........८२
राहुल निकम ......... अपक्ष........९९
लतीफ खान ........ अपक्ष...........१३०
शमीम शेख .......... अपक्ष...........३१५
शहजाद खान ......... अपक्ष........६७२
शेख अहमद .........: अपक्ष...........६७
सद्दाम अब्दुल अ. शेख ...... अपक्ष.........९९
सलीम उस्मान पटेल ........ अपक्ष....८९
सोमनाथ वीर ....... अपक्ष........९४
संतोष साळवे ......अपक्ष..........६४
हनीफ शाह .......... अपक्ष.......६५
नोटा...............१२८९
नोटासह ३० उमेदवार
पोस्टल मते : १५५०
मोजलेली मते : २ लाख १६ हजार ५८०