लिजहोल्डचे फ्री होल्ड करून घेणे ही ‘ऐच्छिक’ योजना; रेडीरेकनर दरानुसार रक्कम भरावी लागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 07:48 PM2024-10-14T19:48:00+5:302024-10-14T19:48:44+5:30

सिडकोच्या मालमत्तेसाठी भाडेपट्ट्याच्या अटीनुसार अनर्जित उत्पन्नाचा भरणा करणे आवश्यक नाही. अशा मालमत्ता फ्री होल्ड करण्यासाठी टेलिस्कोपिक पद्धतीने गणना केली जाईल.

A 'voluntary' scheme to acquire a leasehold freehold; The amount has to be paid as per the readyreckoner rate | लिजहोल्डचे फ्री होल्ड करून घेणे ही ‘ऐच्छिक’ योजना; रेडीरेकनर दरानुसार रक्कम भरावी लागणार

लिजहोल्डचे फ्री होल्ड करून घेणे ही ‘ऐच्छिक’ योजना; रेडीरेकनर दरानुसार रक्कम भरावी लागणार

छत्रपती संभाजीनगर : सिडकोतील निवासी मालमत्ता लिजहोल्डमधून (भाडेकरार) फ्रीहोल्ड (स्वमालकी) करण्यासाठी शासनाने गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतल्यानंतर शुक्रवार ११ ऑक्टोबर रोजी निर्णयाचा अध्यादेश काढण्यात आला. यामध्ये ही एक ऐच्छिक येाजना असून, जर मालमत्ताधारक ताबा हक्कामध्ये फ्री होल्ड करून घेण्यासाठी पुढे आले नाहीत किंवा विक्री दरम्यान लिज टू फ्री होल्ड करण्यासाठी अर्ज करीत नसतील, तर त्या मालमत्ताधारकाचा भाडेकरार सिडकोच्या अटीनुसार कायम राहणार आहे. भूखंडाच्या क्षेत्रफळानुसार चालू रेडीरेकनर दरानुसार रक्कम सिडकोला भरल्यानंतर सिडकोने भाडेकरारावर दिलेले भूखंड स्वमालकीचे होतील.

सिडकोच्या मालमत्तेसाठी भाडेपट्ट्याच्या अटीनुसार अनर्जित उत्पन्नाचा भरणा करणे आवश्यक नाही. अशा मालमत्ता फ्री होल्ड करण्यासाठी टेलिस्कोपिक पद्धतीने गणना केली जाईल. उदाहरणादाखल सांगायचे म्हटले, तर भूखंडाचे क्षेत्रफळ १५० चौरस मीटर असेल आणि भाडेपट्ट्याचा कालावधी ६० वर्षांचा असेल, तर पहिल्या २५ चौरस मीटरसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. पुढील २५ चौरस मीटरसाठी १ टक्का शुल्क आकारले जाईल. त्यापुढच्या ५० चौरस मीटरसाठी २.५ टक्के शुल्क आणि उर्वरित ५० चौरस मीटरसाठी १० टक्के शुल्क आकारले जाईल, म्हणजेच सुमारे १५०० चाैरस फुटांचा भूखंड भाडेकरारावरून स्वमालकीचा करून घ्यायाचा असल्यास १३.५ टक्के शुल्क विद्यमान रेडीरेकनरच्या दरानुसार लागेल. ही सगळी रक्कम एकरकमी भरावी लागेल. दरम्यान विकास नियंत्रण नियमावली (डीसी रुल) तरतुदीनुसार मालकी हक्काने रुपांतरीत करण्यास आलेल्या जमिनीच्या मूळ करारात नमूद एफएसआसय, जमीन वापर, अधिकच्या एफएसआयचा आकारण्यात येणाऱ्या महसूलाचे वाटप सिडको, स्थानिक स्वराज्य संस्था व शासनाच्या प्रचलित पद्धतीने सुरू राहील.


भूखंडांचे क्षेत्रफळ..........३० वर्षांचा भाडेकरार..........३० ते ९० वर्षांचा भाडेकरार......९० वर्षांवरील भाडेकरार
२५ चौरस मीटर............१ टक्के रक्कम लागेल......०० टक्के रक्कम लागेल.................०० टक्के रक्कम लागेल
२६ ते ५० चौरस मीटर...२ टक्के रक्कम लागेल ...........१ टक्के रक्कम लागेल.......... ०.५ रक्कम लागेल
१०१ चौरस मीटर पुढे ....२० टक्के रक्कम लागेल........१० टक्के रक्कम लागेल..........५ टक्के रक्कम लागेल

भूखंड वाटप व दर प्रक्रियेसाठी समिती...
व्यवस्थापकीय संचालक, सिडको समितीचे अध्यक्ष असतील. तर, पीएमआरडीए, एनएमआरडीए नाशिक व नागपूर, छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे महानगर आयुक्त सदस्य असतील. सिडकोचे मुख्य नियोजनकर सदस्यव सचिव असतील. या सर्व प्राधिकरणांना जमीन विनियोग विनियमनच्या तरतुदीनुसार निवासी भूखंड मालकी हक्काने वाटप करण्यासाठी सर्व नियमांमध्ये सुधारणा करावी लागेल.

Web Title: A 'voluntary' scheme to acquire a leasehold freehold; The amount has to be paid as per the readyreckoner rate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.