नातेवाईकांचा अंत्यसंस्कार उरकून निघालेल्या तरुणावर काळाचा घाला, अपघातात जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 12:00 PM2024-08-16T12:00:04+5:302024-08-16T12:00:25+5:30

पिशोर ते कन्नड रोडवर मेहगाव पेट्रोल पंपाजवळ झाला अपघात

A young man who had finished the last rites of his relatives died on the spot in an accident | नातेवाईकांचा अंत्यसंस्कार उरकून निघालेल्या तरुणावर काळाचा घाला, अपघातात जागीच मृत्यू

नातेवाईकांचा अंत्यसंस्कार उरकून निघालेल्या तरुणावर काळाचा घाला, अपघातात जागीच मृत्यू

करंजखेड ( छत्रपती संभाजीनगर): कन्नड तालुक्यातील नागापुर येथील तरुणाचा आज दुपारी मेहगाव पेट्रोल पंपाजवळ दुचाकी अपघातात जागीच मृत्यू झाला. किरण रामराव सनन्से (४२) असे मृताचे नाव आहे. ते नागेश्वर विद्यालयात कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होते. नातेवाईकाचा अंत्यसंस्कार उरकून दुसऱ्या ठिकाणी गृहप्रवेशाच्या कार्यक्रमास जात असताना सनन्से यांना मृत्यूने गाठल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

सविस्तर माहिती अशी की, किरण सनन्से १५ ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता पिशोर येथे नातेवाईकांच्या अंत्यसंस्कार कार्यक्रमासाठी दुचाकीवर गेले होते. अंत्यविधी पूर्ण करून सनन्से दुपारी दोन वाजता ते कन्नड येथे अन्य एका नातेवाईकांच्या गृहप्रवेशाच्या कार्यक्रमासाठी जात होते. या दरम्यान, पिशोर ते कन्नड रोडवर मेहगाव पेट्रोल पंपाजवळ अपघात होऊन सनन्से गंभीर जखमी झाले. काही वेळाने नागरिकांनी त्यांना कन्नड येथील रूग्णालयात दाखल केले. येथे तपासून डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. कन्नड येथे शवविच्छेदन करण्यात आले. अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.

Web Title: A young man who had finished the last rites of his relatives died on the spot in an accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.