हाथरस घटनेच्या निषेधार्थ 'आप'ची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2020 08:45 PM2020-10-03T20:45:00+5:302020-10-03T20:45:39+5:30
आम आदमी पार्टी औरंगाबादच्या वतीने शनिवारी क्रांती चौक येथे हाथरस उत्तर प्रदेश येथील घटनेचा निषेध करण्यात आला. तसेच पिडितेला न्याय न देता पिडितेच्या पालकांचे नार्को टेस्ट करणार असल्याची घोषणा योगी सरकार करत आहे, याचा विरोध म्हणून पार्टीच्या वतीने क्रांती चौक येथे निदर्शने करण्यात आली.
औरंगाबाद : आम आदमी पार्टी औरंगाबादच्या वतीने शनिवारी क्रांती चौक येथे हाथरस उत्तर प्रदेश येथील घटनेचा निषेध करण्यात आला. तसेच पिडितेला न्याय न देता पिडितेच्या पालकांचे नार्को टेस्ट करणार असल्याची घोषणा योगी सरकार करत आहे, याचा विरोध म्हणून पार्टीच्या वतीने क्रांती चौक येथे निदर्शने करण्यात आली.
योगी सरकारच्या विरोधात घोषणा देत योगी सरकार बरखास्त करण्याची मागणीही यावेळी कार्यकर्त्यांनी केली. उत्तर प्रदेशमध्ये कानून व्यवस्थेच्या नावाखाली फक्त जंगल राज चालत असल्याचे वक्तव्य आपचे मराठवाडा अध्यक्ष डॉ. सुभाष माने यांनी केले.
शहराचे सचिव अशिर जयहिंद, औरंगाबाद पूर्वचे अध्यक्ष वैजनाथ राठोड, मध्यचे अध्यक्ष इंद्रिस अहमद, युवा अध्यक्ष मो. रिझवान, सुग्रीव मुंडे, सतीश संचेती, दत्तू पवार, इमरान शेख, लतीफ पठाण, अभय वाडमेरे, रियाज शेख, गौतम गायकवाड यांच्यासह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.