भाविकांविना मंदिरात आरती होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:05 AM2021-04-21T04:05:02+5:302021-04-21T04:05:02+5:30

औरंगाबाद : रामनवमी २१ एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे. मंदिरात पूजा व आरती करण्यात येईल. पण भविकांसाठी मंदिराचे ...

Aarti will be held in the temple without devotees | भाविकांविना मंदिरात आरती होणार

भाविकांविना मंदिरात आरती होणार

googlenewsNext

औरंगाबाद : रामनवमी २१ एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे. मंदिरात पूजा व आरती करण्यात येईल. पण भविकांसाठी मंदिराचे दरवाजे बंद असणार आहेत.

मागील वर्षीप्रमाणे यंदाही रामनवमीला मंदिराचे दरवाजे बंद असणार आहेत. परंपरेत खंड पडू नये म्हणून किराडपुरा येथील श्रीराम मंदिरात पुजारी व विश्वस्त पूजा व आरती करून रामजन्मोत्सव साजरा करणार आहेत. तसेच कुंभारवाडा येथील अमृतेश्वर मंदिर, समर्थनगरातील राममंदिरातही भविकांविना रामनवमी साजरी करण्यात येणार आहे. भविकांनी आपल्या घरातच श्रीरामाच्या प्रतिमेची पूजा करून दुपारी १२ वाजता आरती करावी. राज्य शासनाने दिलेले नियम पाळत कोणीही घरा बाहेर पडू नये, असे आवाहन किराडपुरा श्रीराम मंदिराच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मानसिंग पवार यांनी केले आहे.

Web Title: Aarti will be held in the temple without devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.