‘अब की बार किसान सरकार’, विधानसभेला २८८ उमेदवार उभे करणार: राजू शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 06:26 AM2024-07-31T06:26:27+5:302024-07-31T06:27:33+5:30

ॲड. प्रकाश आंबेडकर, मनोज जरांगे पाटील व बच्चू कडू यांच्याशी बोलणी सुरू आहेत.  शरद पवार नेहमीच अडीच घरे चालतात, हे लक्षात घेतले पाहिजे, असे राजू शेट्टी म्हणाले.

ab ki baar kisan sarkar raju shetti said will give 288 candidates for next legislative assembly election | ‘अब की बार किसान सरकार’, विधानसभेला २८८ उमेदवार उभे करणार: राजू शेट्टी

‘अब की बार किसान सरकार’, विधानसभेला २८८ उमेदवार उभे करणार: राजू शेट्टी

लोकमत न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर : जनसामान्यांच्या प्रश्नांवर चळवळ करणाऱ्या विविध पक्ष-संघटनांना एकत्रित करून आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात  एक सक्षम पर्याय निर्माण  करणार आहोत. या परिवर्तन आघाडीतर्फे सर्व २८८ जागांवर  आश्वासक उमेदवार देऊ. ‘अब की बार किसान सरकार’ अशी आमची घोषणा असल्याचे या संभाव्य आघाडीचे प्रमुख राजू शेट्टी व वामनराव चटप यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.  

शेट्टी म्हणाले, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांकडे बघायला ना महायुतीकडे वेळ आहे ना महाविकास आघाडीकडे. सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात घडत आहेत. शेतीमालाला भाव मिळत नाही. बेरोजगारी आ वासून उभी आहे. शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, बीआरएस या संघटना एकत्रित आल्या आहेत. ॲड. प्रकाश आंबेडकर, मनोज जरांगे पाटील व बच्चू कडू यांच्याशी बोलणी सुरू आहेत.  शरद पवार नेहमीच अडीच घरे चालतात, हे लक्षात घेतले पाहिजे, अशी टिप्पणी देखील त्यांनी केली.  शंकरअण्णा धोंडगे, भाऊसाहेब थोरात, कृष्णा साबळे, यादव कांबळे आदींची उपस्थिती होती.
 

Web Title: ab ki baar kisan sarkar raju shetti said will give 288 candidates for next legislative assembly election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.