Abdul Sattar: मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत वाढ, न्यायालयाने दिले चौकशीचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 12:15 PM2022-02-17T12:15:49+5:302022-02-17T12:17:51+5:30

आमदार अब्दुल सत्तार यांनी 2019 साली विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. या निवडणुकांवेळी शपथपत्रात सादर केलेली माहिती खोटी असल्याची तक्रार एका कार्यकर्त्याने दिली आहे

Abdul Sattar: Minister Abdul Sattar's troubles escalate, Sillod court orders inquiry | Abdul Sattar: मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत वाढ, न्यायालयाने दिले चौकशीचे आदेश

Abdul Sattar: मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत वाढ, न्यायालयाने दिले चौकशीचे आदेश

googlenewsNext

औरंगाबाद - शिवसेना नेते आणि राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड सोयगाव विधानसभा 104 निवडणूक सन 2019 मधील नामनिर्देशन पत्रासोबत सादर केलेल्या शपथपत्रात खोटी माहिती दिल्याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. याप्रकरणी न्यायालयात दाखल याचिकेवर सुनावणी झाली. त्यामध्ये, न्यायालयाने पोलिसांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. 

आमदार अब्दुल सत्तार यांनी 2019 साली विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. या निवडणुकांवेळी शपथपत्रात सादर केलेली माहिती खोटी असल्याची तक्रार एका कार्यकर्त्याने दिली आहे. या शपथपत्रातील मालमत्तेचे विवरण, खरेदी मूल्य, शेअर्स व शैक्षणिक अर्हता यांची खोटी व दिशाभूल करणारी माहिती नमूद केल्याप्रकरणी, डॉ. अभिषेक हरदास, पुणे व सामाजिक कार्यकर्ता महेश शंकरपेल्ली, सिल्लोड यांनी दिनांक 27 ऑक्टोबर 2021 रोजी सिल्लोड न्यायालयात संयुक्त याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती एस, एस. धनराज यांच्याकडे संयुक्त याचिका दाखल करून याप्रकरणात सीआरपीसी 200 व आयपीसी 199, 200 अन्वये कारवाई करुन, मंत्रीअब्दुल सत्तार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. 

दरम्यान, सदर याचिकेमध्ये न्यायालयाने तक्रारदाराचा युक्तिवाद ऐकून सी.आर.पी.सी २०२ अंतर्गत पोलीस चौकशीचे आदेश 16 फेब्रुवारी रोजी दिले आहेत.

Web Title: Abdul Sattar: Minister Abdul Sattar's troubles escalate, Sillod court orders inquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.