अब्दुल सत्तारांचे भाजपाला धोबीपछाड; बाजार समिती निवडणुकीत सर्व १८ उमेदवार विजयी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 04:19 PM2024-01-29T16:19:33+5:302024-01-29T16:21:26+5:30

भाजप व शिवसेना यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.

Abdul Sattar's attack on BJP; All 18 candidates won in market committee elections | अब्दुल सत्तारांचे भाजपाला धोबीपछाड; बाजार समिती निवडणुकीत सर्व १८ उमेदवार विजयी

अब्दुल सत्तारांचे भाजपाला धोबीपछाड; बाजार समिती निवडणुकीत सर्व १८ उमेदवार विजयी

सिल्लोड: कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत शिवसेनेचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पॅनलच्या सर्व १८ पैकी १८ उमेदवारांचा विजय झाला आहे. भाजपाच्या पॅनलचा धुव्वा उडवत मंत्री सत्तार किंग मेकर ठरले आहेत.

भाजप व शिवसेना यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. अब्दुल सत्तार हे पणन मंत्री असल्याने त्यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. २८ जानेवारीला झालेल्या निवडणुकीत तब्बल ९४ टक्के मतदान झाले होते. आज शेवंताबाई मंगल कार्यालयात सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली. दुपारी २ वाजता सर्व जागांचे निकाल हातात आले. यात शिवसेनेच्या पॅनलचे सर्व १८ उमेदवार विजयी झाले. ९ अपक्ष उमेदवारांसहित भाजपच्या पॅनलचा सफाया करत सत्तार यांनी सर्वांना धोबीपछाड दिला. दुपारी सिल्लोड शहरातून विजयी उमेदवारांची मिरवणूक काढण्यात आली.

शिवसेनेचे १८ विजयी उमेदवार असे : 
- शिवसेना (शिंदे)गटाचे सहकारी संस्था सर्वसाधारण मतदार संघातून :-श्रीरंग साळवे, अरुण शिंदे, केशवराव तायडे, प्रभाकर काळे, दामोधर गव्हाणे, जयराम चिंचपुरे,सुनील पाटणी.
- सहकारी संस्था महिला:- शालिनीरहाटे , अनुसयाबाई मोरे
- इतर मागासवर्गीय:- नंदकिशोर सहारे.
- विमुक्त जाती भटक्या जमाती:- सतिष ताठे.
- ग्राम पंचायत सर्वसाधारण:- विश्वास दाभाडे, दारासिंग चव्हाण
- अ.जा.अ.ज:- राजाराम पाडळे.
- दुर्बल घटक:- संदीप राऊत.
- व्यापारी मतदारसंघ:-रमेश लाठी ,भावराव लोखंडे.
- हमाल मापाडी:-शेख जावेद हे १८ उमेदवार बहुमताने निवडून आले

Web Title: Abdul Sattar's attack on BJP; All 18 candidates won in market committee elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.