अब्दुल सत्तार यांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट झाला अन् भाजपाने जल्लोष केला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 13:49 IST2024-12-16T13:48:26+5:302024-12-16T13:49:40+5:30
राज्य मंत्रिमंडळातून आ. अब्दुल सत्तार यांना वगळल्यानंतर सिल्लोड तालुक्यातील जरंडी येथे भाजपाच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला.

अब्दुल सत्तार यांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट झाला अन् भाजपाने जल्लोष केला
सोयगाव : राज्य मंत्रिमंडळातून आ. अब्दुल सत्तार यांना वगळण्यात आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर जरंडी येथे रविवारी सायंकाळी भाजपाच्या वतीने फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला.
सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघात शिंदे सेनेचे माजी मंत्री अब्दुल सत्तार आणि भाजपामध्ये कमालीचा वाद आहे. त्यामुळे सत्तार यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात स्थान देऊ नये, अशी मागणी भाजपाच्या वरिष्ठांकडे केली होती, अशी माहिती जरंडी येथील उपसरपंच संजय पाटील यांनी दिली. या पार्श्वभूमीवर रविवारी सायंकाळी नव्या मंत्र्यांचा शपथविधी झाला. यात सिल्लोडचे आ. अब्दुल सत्तार यांना वगळण्यात आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तसेच भाजपाच्या मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर जरंडी येथे उपसरपंच पाटील यांच्या नेतृत्वाखालील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य संजीवन सोनवणे, मधुकर पाटील, सोसायटीचे चेअरमन एकनाथ चौधरी, भाऊराव पाटील, अनिल छगन पाटील, शिवाजी पंढरी पाटील, विनोद महाजन, कैलास इंगळे, अनिल महाजन, साई पाटील, चेतन पाटील आदींची उपस्थिती होती.