विरोधकांची तटबंदी तोडत अब्दुल सत्तारांचा विजयी चौकार; सुरेश बनकरांची कडवी झुंज निष्फळ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2024 05:35 PM2024-11-24T17:35:51+5:302024-11-24T17:41:01+5:30

- श्यामकुमार पुरे सिल्लोड : सिल्लोड -सोयगाव विधानसभा मतदारसंघात झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत शेवटच्या क्षणी महायुतीचे उमेदवार अब्दुल सत्तार यांनी ...

Abdul Sattar's winning four breaking the opposition's fortifications; Suresh Bankar's bitter fight was fruitless | विरोधकांची तटबंदी तोडत अब्दुल सत्तारांचा विजयी चौकार; सुरेश बनकरांची कडवी झुंज निष्फळ

विरोधकांची तटबंदी तोडत अब्दुल सत्तारांचा विजयी चौकार; सुरेश बनकरांची कडवी झुंज निष्फळ

- श्यामकुमार पुरे
सिल्लोड :
सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघात झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत शेवटच्या क्षणी महायुतीचे उमेदवार अब्दुल सत्तार यांनी बाजी मारून इतिहास घडविला आहे. विशेष म्हणजे सत्तार यांचा या मतदारसंघातून हा चौथ्यांदा विजय झाला आहे.

१ लाख ३७ हजार ९६० मते मिळवित २ हजार ४२० अधिक मते घेऊन महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश बनकर यांचा सत्तार यांनी पराभव केला. बनकर यांना १ लाख ३५ हजार ५४० मते मिळाली आहेत. दरम्यान, बनकर यांनी फेरमतमोजणी करण्याचा अर्ज दिला होता, मात्र निवडणूक निर्वाचन अधिकारी लतीफ पठाण यांनी तो फेटाळून लावला. शनिवारी संध्याकाळी ७ वाजता निकाल घोषित करण्यात आला. या मतदारसंघात एकूण २ लाख ८६ हजार ६८२ मतदान झाले होते. त्यात टपाली मतदान २ हजार ७८५ होते. परंतु त्यातील १५५ मतदान बाद झाले.

सकाळी ८ वाजेपासूनच फेरीअखेर मतांचा आकडा जसा बाहेर येत होता, तशी तशी दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांची धाकधूक वाढत होती. शेवटी सत्तार यांचा २ हजार ४२० मतांनी विजय झाला. त्यानंतर सत्तार समर्थकांनी मतदारसंघात फटाक्यांची आतषबाजी, ढोलताशे, जय भवानी जय शिवाजी असा जयघोष करत जल्लोष साजरा केला. याशिवाय सिल्लोड शहरातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्र ते बायपास रोड व नंतर शहराच्या मुख्य रस्त्याने सत्तार यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली.

उमेदवारांना मिळालेली एकूण मते
उमेदवार             पक्ष             मिळालेली मते

अब्दुल सत्तार, महायुती १ लाख ३७ हजार ९६०.
सुरेश बनकर, महाविकास आघाडी, १ लाख ३५ हजार ५४०.
संघपाल सोनवणे, बहुजन समाज पार्टी, १ हजार १३५.
बनेखा पठाण, वंचित बहुजन आघाडी, १ हजार ९८९.
राजू अफसर तडवी भारतीय ट्रायबल पार्टी, १६२.
शेख उस्मान शेख ताहेर, ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक, १४१.
अनिल मदन राठोड, अपक्ष ३६६.
राजू अफसर तडवी, अपक्ष १६२.
अरुण चिंतामण चव्हाण, अपक्ष, ९१.
अशोक विठ्ठल सोनवणे, अपक्ष १२२.
दादाराव श्रीराम आळणे, अपक्ष, २१०.
राजू अशोक गवळी, अपक्ष, १६६.
परीक्षित माधवराव भरगाडे, अपक्ष, ३३९
सुरेश पांडुरंग बनकर, अपक्ष, ९०७.
भास्कर शंकर सरोदे, अपक्ष, १ हजार ५७०.
रफिक मनव्वरखान पठाण, अपक्ष १६१२.
राजू पांडुरंग साठे, अपक्ष, १८३०.
राहुल अंकुश राठोड, अपक्ष, २७०५.
विकास भानुदास नरवडे, अपक्ष ३४०.
शरद अन्ना तिगोटे, अपक्ष १५१.
शेख मुख्तार शेख सादिक, अपक्ष, २६७.
श्रावण नारायण शिनकर, अपक्ष ७६.
सचिन दादाराव हावळे, अपक्ष ५२८.
संदीप एकनाथ सुरडकर, अपक्ष, ३०२.
अफसर अकबर तडवी, अपक्ष ७८
नोटा ७२५

विजयाची कारणे
१) सत्तार यांच्याकडे असलेली कार्यकर्त्यांची मोठी फळी. तगडा जनसंपर्क, सर्व शक्ती पणाला लावली.
२) विकासकामांच्या जोरावर निवडणूक लढविली, मतदारसंघात राबविलेल्या योजना, लाडक्या बहिणींनी साथ दिली.
३) गावागावात केलेले योग्य नियोजन.

पराभवाची कारणे
मतदारसंघात योग्य नियोजन झाले. परंतु ग्रामीण भाग व सिल्लोड शहरातील विशेषत: मुस्लीम समाजाची मते मिळविता आली नाहीत. याबाबत बनकर मागे राहिले. याउलट अब्दुल सत्तार यांच्यासोबत मुस्लीम मतदार खंबीरपणे राहिले. याशिवाय वंचित बहुजन आघाडी आणि इतर मुस्लीम अपक्ष उमेदवारांना अपेक्षेपेक्षा कमी मते मिळाले. बनकर यांनी शेवटपर्यंत सत्तार यांच्यासोबत जबरदस्त लढत दिली. परंतु अखेर बनकर यांचा निसटता पराभव झाला.

Web Title: Abdul Sattar's winning four breaking the opposition's fortifications; Suresh Bankar's bitter fight was fruitless

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.