परीक्षार्थींच्या मदतीला धावले ‘अभाविप’चे पदाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:03 AM2021-03-22T04:03:51+5:302021-03-22T04:03:51+5:30
औरंगाबाद : रविवारी लॉकडाऊनच्या परिस्थितीत सर्व काही बंद असल्यामुळे ‘एमपीएससी’ परीक्षार्थींची गैरसोय होऊ नये म्हणून अभाविप व जनकल्याण समितीच्या ...
औरंगाबाद : रविवारी लॉकडाऊनच्या परिस्थितीत सर्व काही बंद असल्यामुळे ‘एमपीएससी’ परीक्षार्थींची गैरसोय होऊ नये म्हणून अभाविप व जनकल्याण समितीच्या वतीने अल्पोपहाराची पाकिटे वाटप करण्यात आली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात शनिवार व रविवारी संपूर्ण दिवस लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यात रविवारी शहरात ‘एमपीएससी’ची परीक्षा होती. परीक्षेसाठी बाहेरुन हजारो विद्यार्थी आले होते. मात्र, लॉकडाऊनमुळे सर्व हॉटेल्स बंद होती. प्रशासनानेही या विद्यार्थ्यांसाठी कोणतीही सुविधा उपलब्ध केली नव्हती. या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून अभाविप व जनकल्याण समितीच्या वतीने शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, स्वामी विवेकानंद महाविद्यालय, पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालय, सरस्वती भुवन महाविद्यालय, शिवछत्रपती महाविद्यालय, संत मीरा विद्यालय आदी परीक्षा केंद्रावर तब्बल २ हजार ‘फूड पॅकेट्स’चे वाटप करण्यात आले.
यासाठी अभाविपचे प्रदेश सहमंत्री अंकिता पवार, महानगर मंत्री निकेतन कोठारी, जिल्हा संयोजक श्यामसुंदर सोडगिर, जनकल्याण समितीचे प्रसन्नकुमार बोटे आदींसह विद्यार्थी परिषद व जनकल्याण समितीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.