अभाविपकडून विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:03 AM2021-02-16T04:03:56+5:302021-02-16T04:03:56+5:30
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व शहरातील संलग्नित महाविद्यालयांच्या प्रवेशद्वारावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या ...
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व शहरातील संलग्नित महाविद्यालयांच्या प्रवेशद्वारावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत केले. काही दिवसांपूर्वी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकारी व विद्यार्थ्यांनी ‘महाविद्यालय उघडा’ यासाठी राज्यभरात आंदोलन केले. त्यानंतर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी १५ फेब्रुवारीपासून पदवी अभ्यासक्रमांची महाविद्यालये उघडण्याची घोषणा केली.
अकरा महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर महाविद्यालये व विद्यापीठ परिसर सुरू झाला. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस आनंदाचा आहे. त्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या प्रदेश सहमंत्री अंकिता पवार यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी विद्यापीठ मुख्यप्रवेशद्वारावर फित कापून ढोल-ताशांच्या गजरात, फुलांचा वर्षाव करत, फटाक्यांची आतषबाजी केली. तसेच देवगिरी महाविद्यालय, विवेकानंद महाविद्यालय, आयटीआय, सरस्वती भुवन महाविद्यालय, शिवछत्रपती महाविद्यालय, वसंतराव नाईक महाविद्यालय, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, दगडोजीराव देशमुख महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांचे पुष्पवर्षाव करून स्वागत केले.
यावेळी विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचाऱ्यांना साखर वाटप करत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. महाविद्यालय परिसरातील व विद्यापीठ परिसरातील वसतिगृह व मेस तात्काळ सुरू करावी, येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांच्या हितासाठी अभाविप तत्पर असेल अशी भूमिका प्रदेश सहमंत्री अंकिता पवार व महानगरमंत्री निकेतन कोठारी यांनी मांडली. यावेळी सहमंत्री उमाकांत पांचाळ, ऋषिकेश केकान, जिल्हा सहसंयोजक अंबादास मेव्हनकर, नागेश गलांडे, दीपक टोनपे, नगरमंत्री प्रवीण शिरसाठ, उमेश मुळे, सुभाष बोडखे, धनंजय शेरकर, डिंपल भोजवानी, रोहित चिंचोडकर, चेतन राठोड आदीसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- फोटो कॅप्शन ......
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गेटसमोर ढोल-ताशांचा गजर व फुलांचा वर्षाव करत अभाविपने विद्यार्थ्यांचे असे स्वागत केले.