पतीने दांड्याने मारहाण केल्याने विवाहितेचा गर्भपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:03 AM2021-09-13T04:03:07+5:302021-09-13T04:03:07+5:30
औरंगाबाद : गर्भवती असल्याचे माहीत असूनही पत्नीला दांड्याने मारहाण केल्याने गंभीर जखमी झालेल्या विवाहितेचा उपचारादरम्यान गर्भपात झाला. ...
औरंगाबाद : गर्भवती असल्याचे माहीत असूनही पत्नीला दांड्याने मारहाण केल्याने गंभीर जखमी झालेल्या विवाहितेचा उपचारादरम्यान गर्भपात झाला. या गर्भपाताला पतीसह सासरची मंडळी कारणीभूत असल्याची तक्रार विवाहितेने सिडको पोलीस ठाण्यात नोंदविली. याप्रकरणी सिडको ठाण्यात पतीसह सासरच्या पाच जणांविरोधात गुन्हा नोंदविला.
ही घटना २५ सप्टेंबर २०१९ ते ५ जून २०२१ दरम्यान झाल्याचे तक्रारीत नमूद केले. तक्रारदार आणि तिचा पती खासगी नोकरी करतो. घरगुती कारणावरून पती-पत्नीमध्ये वाद सुरू होता. यादरम्यान पतीसह तिचे सासू, सासरे, दीर आणि नणंद हे तिला मारहाण करीत. काहीतरी कारणावरून आरोपी पती सुमित लक्ष्मण आगळे याने ४ जानेवारी २०२० रोजी पत्नीला दांड्याने मारहाण करून जखमी केले. यानंतर तिला रुग्णालयात दाखल केले असता तेथे तिचा गर्भपात झाला. आपल्या गर्भपाताला पतीसह सासरची मंडळी कारणीभूत असल्याची तक्रार नोंदविल्याने पोलिसांनी पती सुमित लक्ष्मण आगळे, सासरा लक्ष्मण जयराम आगळे, दिर अमित लक्ष्मण आगळे आणि सासू, नणंद (सर्व रा. सिडको एन ५, संभाजी कॉलनी) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.