घाटीत ५० टक्के कोरोना रुग्ण ‘ऑक्सिजन’वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:02 AM2021-02-24T04:02:57+5:302021-02-24T04:02:57+5:30
औरंगाबाद : घाटी रुग्णालयात कोरोनाचे १२७ रुग्ण दाखल आहेत. त्यातील ५० टक्के रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. घाटीत आजघडीला सुपर ...
औरंगाबाद : घाटी रुग्णालयात कोरोनाचे १२७ रुग्ण दाखल आहेत. त्यातील ५० टक्के रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. घाटीत आजघडीला सुपर स्पेशालिटी ब्लॉकच्या इमारतीत २४८ खाटांची व्यवस्था आहे. त्यापेक्षा अधिक रुग्ण वाढले तर पुन्हा एकदा मेडिसिन विभागात कोरोना रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत.
घाटीत सध्या ३५० रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध आहेत. आणखी १६०० इंजेक्शन प्राप्त होणार आहेत, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली. घाटीत कोरोनाच्या ४५० रुग्णांवर एकाचवेळी उपचार करण्यात आले आहेत. त्यामुळे उपचारासाठी घाटी सज्ज आहे. घाटीत ९६ आयसीयू बेड आहे आणि तेवढेच व्हेंटिलेटर आहेत. सुपर स्पेशालिटी ब्लॉकमध्ये २४८ ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत तर ५० आयसीयू बेड आहेत.
नॉन कोविड खाटा फुल्ल
घाटी रुग्णालयात नॉन कोविड रुग्णांच्या ११७७ खाटाही सध्या फुल्ल आहेत. कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी १५५ कर्मचारी आवश्यक आहे. त्यावर दोन दिवसांत निर्णय होईल. सध्या पुरेशा सुविधा असल्याचे घाटी प्रशासनाने सांगितले.