अबब... गॅस्ट्रोचे साडेतीन हजारांवर रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 12:22 AM2017-11-15T00:22:15+5:302017-11-15T00:22:22+5:30
छावणी परिसरातील गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या तब्बल साडेतीन हजारांवर गेली आहे. परिसरातील २५ टक्क्यांवर नागरिक गॅस्ट्रोने बाधित झाले असून, छावणी सामान्य रुग्णालयात रुग्णांच्या दररोज रांगा लागत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : छावणी परिसरातील गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या तब्बल साडेतीन हजारांवर गेली आहे. परिसरातील २५ टक्क्यांवर नागरिक गॅस्ट्रोने बाधित झाले असून, छावणी सामान्य रुग्णालयात रुग्णांच्या दररोज रांगा लागत आहेत. जिल्ह्यात पहिल्यांदाच एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्णांना जलजन्य आजाराने विळखा घातल्याने आरोग्य विभागाच्या पायाखालची जमीनच सरकली आहे.
छावणी सामान्य रुग्णालयात शनिवारपर्यंत रुग्णांची संख्या २५० वर होती; परंतु अवघ्या चार दिवसांतच ही संख्या साडेतीन हजारांवर पोहोचली. खाजगी रुग्णालयात उपचार घेणाºयांची संख्याही अधिक आहे. त्यामुळे रुग्णसंख्या अधिक असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. परिसरातील घराघरांतील सदस्य गॅस्ट्रोच्या त्रासाने त्रस्त आहेत. उलट्या, जुलाब आणि पोटदुखीच्या त्रासाने शेकडो नागरिक हैराण झाले आहेत.