औरंगाबाद मनपाच्या निलंबित अभियंत्याच्या घरावर एसीबीचा छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 12:12 PM2018-02-22T12:12:19+5:302018-02-22T12:26:29+5:30
महानगरपालिकेचे निलंबित अभियंता बाबुलाल कचरु गायकवाड यांच्या घरावर आज सकाळी अँटी करप्शन ब्यूरोने छापा टाकला.
औरंगाबाद : महानगरपालिकेचे निलंबित अभियंता बाबुलाल कचरु गायकवाड यांच्या नंदनवन कॉलनी येथील घरावर आज सकाळी अँटी करप्शन ब्यूरोने छापा टाकला. गायकवाड यांच्या विरोधात बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी छावणी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दीड वर्षापूर्वी लाच घेतल्याप्रकरणी निलंबित असलेल्या अभियंता गायकवाड याच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. यावरून त्यांची अधिक चौकशी सुरू होती. चौकशी दरम्यान गायकवाड याने उत्पन्नापेक्षा अधिक माया जमविल्याचे उघडकिस आले. यावरून पोलिसांनी आज पहाटे छावणी ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा नोंदविला. यानंतर डीवायएसी किशोर चौधरी यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने गायकवाड यांच्या नंदनवन कॉलनीतील बंगल्यावर छापा मारला असून घर झडती सुरू आहे. घरझडतीत पोलिसांच्या हाती किती घबाड लागले याची माहिती अद्याप समोर आली नाही.