पैठण तालुक्यात कोरोना लसीकरण वेगात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:04 AM2021-02-08T04:04:51+5:302021-02-08T04:04:51+5:30
शहरातील ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्रातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांसह ३० जणांना रविवारी लसीकरण करण्यात आले आहे, असे रुग्णालयाचे प्रपाठक डॉ. ...
शहरातील ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्रातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांसह ३० जणांना रविवारी लसीकरण करण्यात आले आहे, असे रुग्णालयाचे प्रपाठक डॉ. भारत चव्हाण यांनी सांगितले.
येत्या काळात शहरात तीनशे जणांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असून खासगी डॉक्टर व त्यांच्याकडील कर्मचारी अशा १०० जणांना सोमवारी लसीकरण करण्यात येणार आहे. तालुक्यातील शासकीय व खासगी डॉक्टर्स व त्यांच्या रुग्णालयातील कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा कार्यकर्त्या मिळून १,९३४ जणांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे, असे लुका सिकलसेल समन्वयक प्रतिभा शेळके यांनी सांगितले.
आजपर्यंत पाचोड, आडूळ, विहामांडवा, नांदर, बीडकीन ढाकेफळ, निलजगाव, ढोरकीन आदी भागात ५६५ जणांना लस देण्यात आली. जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांनी लसीकरण करावे, असे आवाहन केले.