वेतन प्रमाणपत्रासाठी स्वीकारली लाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 12:24 AM2017-08-09T00:24:00+5:302017-08-09T00:24:00+5:30

अंतिम वेतन प्रमाणपत्र देण्यासाठी शिक्षकाकडून दोन हजारांची लाच स्वीकारणाºया येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ सहायक व शिपायावर लाचलुचपत विभागाने मंगळवारी कारवाई केली

Accepted bribe for wages certificate | वेतन प्रमाणपत्रासाठी स्वीकारली लाच

वेतन प्रमाणपत्रासाठी स्वीकारली लाच

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : अंतिम वेतन प्रमाणपत्र देण्यासाठी शिक्षकाकडून दोन हजारांची लाच स्वीकारणाºया येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ सहायक व शिपायावर लाचलुचपत विभागाने मंगळवारी कारवाई केली. मनोहर देवराव शेळके (५६) व पवन रमेश नलावडे (२५) अशी लाच स्वीकारणाºया दोघांची नावे आहेत.
यातील तक्रारदार शिक्षक असून, त्यांची जुलैमध्ये जालन्याहून पुण्याला बदली झाली आहे. त्यांचे सेवापुस्तक व अंतिम वेतन प्रमाणपत्र जालना कार्यालयाने पुणे कार्यालयास न पाठविल्याने वेतनात अडचणी येत होत्या. तक्रारदारांनी येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ सहायक मनोहर शेळके यांची भेट घेऊन सेवापुस्तक व अंतिम वेतन प्रमाणपत्र देण्याबाबत विनंती केली. या कामासाठी शेळके याने चार हजारांची लाच मागितली.

Web Title: Accepted bribe for wages certificate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.