मेंदूतील ट्यूमरवर शस्त्रक्रियेविना अचूक उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:02 AM2021-05-27T04:02:12+5:302021-05-27T04:02:12+5:30

मेंदूतील ट्यूमरवर शस्त्रक्रियेविना अचूक उपचार : स्टिरिओ- टॅक्टिक बायोप्सी रुग्णांसाठी वरदान औरंगाबाद : काही वर्षांपूर्वी ब्रेन ट्यूमर झाला हे ...

Accurate treatment without surgery on brain tumors | मेंदूतील ट्यूमरवर शस्त्रक्रियेविना अचूक उपचार

मेंदूतील ट्यूमरवर शस्त्रक्रियेविना अचूक उपचार

googlenewsNext

मेंदूतील ट्यूमरवर शस्त्रक्रियेविना अचूक उपचार

: स्टिरिओ- टॅक्टिक बायोप्सी रुग्णांसाठी वरदान

औरंगाबाद : काही वर्षांपूर्वी ब्रेन ट्यूमर झाला हे कळाले की रुग्ण व त्यांचे नातेवाईक हादरून जात असत; पण आता आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे कोणत्याही मोठ्या शस्त्रक्रियेविना ट्युमर काढून टाकणे अत्यंत सोपे व सहज झाले आहे. रुग्णासाठी वरदान ठरलेल्या त्या आधुनिक तंत्रज्ञानाचे नाव आहे ‘स्टिरिओ- टॅक्टिक बायोप्सी’ (एसटीबी). या तंत्राद्वारे आतापर्यंत असंख्य रुग्ण ट्यूमरमुक्त होऊन आनंदीत जीवन जगत आहेत.

विशेष म्हणजे ही स्टिरिओ- टॅक्टिक बायोप्सी आता औरंगाबादमध्ये उपलब्ध झाली आहे. यामुळे रुग्णांना आता ट्यूमरच्या शस्त्रक्रियेसाठी पुणे-मुंबईला जाण्याची व मोठा खर्च करण्याची आवश्यकता राहिली नाही. ‘एसटीबी’ची सुविधा सिडको बसस्थानक समोरील ‘फिनिक्स हॉस्पिटल, न्यूरो-स्पाईन अँड ट्रॉमा सेंटर’ येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्टिरिओ- टॅक्टिक बायोप्सीसाठी राज्यात प्रसिद्ध असलेले न्युरोसर्जन डॉ. गणेश राजपूत (नाचणवेलकर) हे स्वतः येथे उपलब्ध असतात. डॉ. राजपूत यांनी सांगितले की, मेंदू हा शरीरातील अत्यंत नाजूक अवयव आहे. यामुळे मेंदूवरील शस्त्रक्रिया अन्य शस्त्रक्रियापेक्षा अत्यंत गुंतागुंतीची असते. ‘स्टिरिओ- टॅक्टिक बायोप्सी’मुळे आता मेंदूमध्ये तयार झालेला ट्युमर/ गाठ शोधणे व त्यावर अचूक निदान करणे अत्यंत सोपे झाले आहे. एवढे सोपे की, मोठ्या शस्त्रक्रियेविना तसेच रुग्णाला भूल न देता अवघ्या दोन तासांत पार पाडता येते. एवढेच नव्हे, तर त्याच दिवशी रुग्णाला घरीसुद्धा जाता येते. यामुळे वेळ आणि पैशाची मोठी बचत होतेच, शिवाय रुग्ण पुढील दोन महिन्यांत सर्वसामान्यांसारखे जीवन जगायला लागतो.

१) स्टिरिओ- टॅक्टिक बायोप्सी म्हणजे काय?:

डॉ. राजपूत यांनी सांगितले की, स्टिरिओ- टॅक्टिक बायोप्सी म्हणजे मेंदूच्या पेशींना सुईएवढा अत्यंत सूक्ष्म छेद देऊन पुढील उपचारांसाठी केलेली प्रक्रिया होय. सीटी स्कॅन व एमआरआयद्वारे मेंदूतील गाठ नेमकी कुठे आहे, त्याच्या आजूबाजूला काही महत्त्वाच्या नसा, रक्तवाहिन्या आहेत का, असल्या तर त्या नेमक्या कुठल्या दिशेने जात आहेत. कुठल्या भागाला चिकटलेल्या आहेत याची पूर्ण माहिती मिळते. अचूक निदानानंतर ‘स्टिरिओ- टॅक्टिक बायोप्सी’द्वारे मेंदूला सूक्ष्म छेद देऊन त्याद्वारे खोलवर त्या ट्यूमरपर्यंत जाऊन तो काढला जाऊ शकतो. यात गाठ काढताना मेंदूतील महत्त्वाच्या भागाला धक्का न लागू देता ही प्रक्रिया करता येते.

२) स्टिरिओ-टॅक्टिक बायोप्सीपुढील उपचारांसाठी दिशादर्शक :

डॉ. राजपूत यांनी संगितले की, स्टिरिओ-टॅक्टिक बायोप्सी पुढील उपचारांसाठी दिशादर्शक ठरत आहे. मेंदूतील गाठ अत्यंत नाजूक भागात असेल आणि ऑपरेशन करून ती काढून टाकणे अशक्य असेल, तर स्टिरिओ-टॅक्टिक बायोप्सीने त्या गाठीचा छोटा तुकडा काढून तो मायक्रोस्कोपखाली तपासला जातो. यावरून ती गाठ कुठल्या प्रकारची आहे. याचे अचूक निदान होऊ शकते. यावरून पुढे त्या रुग्णावर रेडिएशन किंवा किमोथेरपी करायची याचा निर्णय घेतला जातो.

चौकट -

‘एसटीबी’चे फायदे

* स्टिरिओ- टॅक्टिक बायोप्सीमुळे मेंदूमधील ट्यूमर व अन्य जखमांचे त्वरित निदान केले जाते.

* मेंदूला सूक्ष्म छिद्र पाडून त्यातून ट्यूमरपर्यंत जाऊन यशस्वी उपचार केले जातात.

* यासाठी रुग्णाला मोठी भूल देण्याची गरज नसते.

* अवघ्या दोन तासांत ऑपरेशन यशस्वीपणे पार पडते.

* रुग्णाला काहीच त्रास होत नाही.

* काही तासांच्या देखरेखीनंतर रुग्णाला त्याच दिवशी घरी पाठविले जाते.

* रुग्णाला हॉस्पिटलमध्ये जास्त दिवस थांबावे लागत नाही, तो मोठा खर्च वाचतो.

* अवघ्या दोन महिन्यांच्या कालावधीत रुग्ण सर्वसामान्यांसारखे जीवन जगू शकतो.

चौकट -

ब्रेन ट्यूमरची लक्षणे

न्यूरोसर्जन डॉ. गणेश राजपूत यांनी सांगितले की, ब्रेन ट्यूमरची लक्षणे म्हणजे प्रचंड डोकेदुखू लागणे व त्यासोबत उलट्या होणे हे आहे. घरगुती उपचार करण्यात वेळ न घालविता. न्यूरोसर्जनला दाखवा. ब्रेन ट्यूमरचे लवकर निदान झाले की, लवकर उपचार करून रुग्ण बरा होऊ शकतो व शरीरावर होणारे दुष्परिणाम टाळता येतात.

चौकट

जनजागृतीची गरज

ब्रेन ट्यूमरवर अत्यंत साधी व सोपी उपचार पद्धती म्हणजे ‘स्टिरिओ- टॅक्टिक बायोप्सी’ होय. याविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती होणे आवश्यक आहे. कमी खर्चात व अचूक, योग्य उपचार याद्वारे केले जाते.

Web Title: Accurate treatment without surgery on brain tumors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.