वाळूजला फरार आरोपी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:02 AM2020-12-25T04:02:11+5:302020-12-25T04:02:11+5:30
-------------------------- भागवत कथा सप्ताहाची सांगता वाळूज महानगर : म्हाडा कॉलनी परिसरातील पारिजात नगरात आयोजित भागवत कथेची मंगळवारी (दि.२२) ...
--------------------------
भागवत कथा सप्ताहाची सांगता
वाळूज महानगर : म्हाडा कॉलनी परिसरातील पारिजात नगरात आयोजित भागवत कथेची मंगळवारी (दि.२२) महाप्रसाद वाटपाने सांगता करण्यात आली. भागवताचार्य विशाल महाराज मंठेकर यांनी कथा वाचन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कोमल स्वप्न सेवाभावी संस्था व तुळजाभवानी महिला मंडळाच्या लता बन, रेखा सूर्यवंशी, सीमा कसुरे, रेखा शेळके, मनिषा परगे, सुनीता गाडेकर, शीतल रांजणे, कल्पना वाघमारे, रत्ना पाटील, वर्षा हनुमंते आदींनी परिश्रम घेतले.
--------------------
बजाजनगरात कोरोना योद्धयांचा आज सत्कार
वाळूज महानगर : वाळूज महानगर परिसरात लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना मदत करणाऱ्या कोरोना योद्धयांचा शुक्रवारी (दि.२५) सायंकाळी ४ वाजता बजाजनगरात सत्कार करण्यात येणार आहे. क्रिएटिव्ह चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने बजाजनगरातील दत्त मंदिर परिसरात हा कार्यक्रम होईल. उपस्थितीत राहण्याचे आवाहन आयोजक विष्णुदास पाटील, पारसचंद साकला यांनी केले आहे.
-------------------------
बॅरिकेट्समुळे रहदारीस अडथळा
वाळूज महानगर : शिवराई पथकर नाक्यावर बॅरिकेट्स- उभारल्यामुळे रहदारीस अडथळा होऊन अपघाताचा धोका वाढला आहे. या नाक्याच्या दोन्ही बाजूने बॅरिकेट्स टाकण्यात आल्यामुळे ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. अडथळ्यामुळे नाक्यावर पथकर भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. रहदारीस अडथळा ठरणारे बॅरिकेट्स हटविण्याची मागणी वाहनधारकातून केली जात आहे.
--------------------------
रामराई टी पाॅंईटवर वाहतूक कोंडी
वाळूज महानगर : वाळूज-कमळापूर रस्त्यावरील रामराई टी पाॅंईटवर अतिक्रमणे व बेशिस्त वाहनधारकामुळे सतत वाहतुकीची कोंडी होत आहे. वाळूज गावातून कमळापूर तसेच रामराई व जोगेश्वरीकडे या टी पाॅंईटवरुनच वाहनधारकांना ये-जा करावी लागते. या ठिकाणी विविध व्यावसायिकांनी अतिक्रमणे केल्यामुळे तसेच दुकानात खरेदीसाठी येणारे ग्राहकही रस्त्यावर वाहने उभी करीत असल्यामुळे वाहतुकीची सतत कोंडी होत आहे.
-------------------------