बोगस विमा रॅकेटमध्ये फिर्यादीच निघाला आरोपी

By Admin | Published: February 15, 2017 05:29 PM2017-02-15T17:29:45+5:302017-02-15T17:29:45+5:30

न झालेल्या अपघाताचा बनावट विमा दावा दाखल करून विमा कंपनीची फसवणूक झाल्याची तक्रार नोंदविणाराचा कंपनीचा अधिकारीच या रॅकेटचा सदस्य असल्याचे पोलिस तपासात

Accused in the bogus insurance racket | बोगस विमा रॅकेटमध्ये फिर्यादीच निघाला आरोपी

बोगस विमा रॅकेटमध्ये फिर्यादीच निघाला आरोपी

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 15  -  न झालेल्या अपघाताचा बनावट विमा दावा दाखल करून विमा कंपनीची फसवणूक झाल्याची तक्रार नोंदविणाराचा कंपनीचा अधिकारीच या रॅकेटचा सदस्य असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. या रॅकेटमधील डॉक्टर, दलाल आणि पोलीस हवालदार सध्या कोठडीत असून, यात आणखी दोन पोलिसांचा समावेश आहे. या रॅकेटने १५ दिवसांत बोगस विमा दाव्यातून तब्बल ६० लाख रुपये उचलल्याचे तपासात समोर आल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बुधवारी दिली.
बोगस विम्याची कागदपत्रे तयार करणाऱ्या रॅकेटमधील डॉ. महेश मोहरीर ( रा. जवाहर कॉलनी), दलाल शेख लतीफ शेख अब्दुल ( रा. समता नगर), आणि पोलीस हेडकॉन्स्टेबल अब्दल रज्झाक अब्दुल रहीम(नेमणूक सिटीचौक पोलीस ठाणे) हे १५फेब्रुवारीपर्यंत हे आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की, एचडीएफसी इआरजीओ, एसबीआय जनलर विमा कंपनी आणि फ्यूचर जनरली विमा कंपनीकडे बोगस विमा दावे दाखल  करून या रॅकेट्सने फसवणूक केल्याचे समोर आले होते. याप्रकरणी एचडीएफसी इआरजीओचा अधिकारी सतीश अवचार याच्या फियार्दीवरून वेदातनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्याचा तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हेडकॉन्स्टेबल आर.डी. नरवडे (बक्कल नंबर १०३८) आणि छावणी ठाण्यात कार्यरत असलेले पोली हेड कॉन्स्टेबल मुश्ताक शेख(बक्कल नंबर १२४)यांचाही या रॅकेटमध्ये सहभाग असल्याचे समोर आले. या दोन्ही पोलिसांनीही बोगस अपघात पंचनामे केलेले होते.
पंधरा दिवसात ६०लाख उचलले
या रॅकेट्सने बनावट कागदपत्राच्या आधारे पंधरा दिवसात ६० लाखाहून अधिक विमा रक्कम उचलले. विशेष म्हणजे आरोपी शेख लतीफ याने कोर्टातील काही कर्मचाऱ्यांनाही मॅनेज केले होते. विमा कंपनीच्या नावे कोर्टाने काढलेली नोटीस कोर्टातील कर्मचारी रजिस्टर्ड डाकने न पाठविता तो शेख लतीफकडे देत.आणि लतीफ हा ही नोटीस हातोहात अवचारकडे देत. अवचारही या रॅके टमध्ये सहभागी असल्याने तो आरोपींना मदत करीत.
बँकेत खात्याचे डिटेल्स मागविले..
अपघात विम्याची रक्कम विमा कंपनीकडून धनादेश अथवा आरटीजीएसने देण्यात येते. यामुळे आरोपींनी काही दिवसापूर्वीच बोगस जखमींची बँक खातेही उघडली. ज्या खात्यात ही रक्कम वर्ग झाली त्यांची नावे आणि पत्ते,कागदपत्रांची माहिती बँकांकडून पोलिसांनी मागविली आहे.

Web Title: Accused in the bogus insurance racket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.