गहू प्रकरणी आरोपींना कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 12:36 AM2017-08-26T00:36:12+5:302017-08-26T00:36:12+5:30

वसमत ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील माळवटा शिवारात एलसीबीच्या पथकाने राशनच्या गव्हासह दोन आरोपी अटक केली होती. त्या आरोपींना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या छाप्यामुळे वसमत पोलीस उपविभागांतर्गत येणाºया पोलीस ठाणे हद्दीत राशनची तस्करीसह सर्वच अवैधधंद्यांनी जोर धरला असल्याचे स्पष्ट दिसत आहे

The accused in the case of wheat | गहू प्रकरणी आरोपींना कोठडी

गहू प्रकरणी आरोपींना कोठडी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वसमत : वसमत ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील माळवटा शिवारात एलसीबीच्या पथकाने राशनच्या गव्हासह दोन आरोपी अटक केली होती. त्या आरोपींना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या छाप्यामुळे वसमत पोलीस उपविभागांतर्गत येणाºया पोलीस ठाणे हद्दीत राशनची तस्करीसह सर्वच अवैधधंद्यांनी जोर धरला असल्याचे स्पष्ट दिसत आहे. उपविभागात वाढलेल्या या प्रकारावर पुन्हा एकदा बाहेरच्या विशेष पथकाच्या छाप्याची गरज निर्माण झाल्याचे चित्र आहे.
वसमत तालुक्यातील कुरूंदा भाग अवैधधंदे व राशनची तस्करीसाठी सुरक्षित अड्डा झाल्याचे चित्र आहे. कुरूंदा पोलीस ठाणे हद्दीतील चोंडी येथे खुलेआम सुरू झालेल्या मटक्यावर ठाणेदार कारवाई करत नाहीत तर एलसीबीच्या पथकाने छापा मारून तेथे मटका सुरू असल्याचे सप्रमाण सिद्ध केले आहे. तोच प्रकार राशनच्या तस्करीसंदर्भातही पहावयास मिळत आहे.
वसमत ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील माळवटा शिवारात एलसीबीने राशनच्या गव्हाचा ट्रक पकडला. १० हजार टन गहू व दोन जणांना गजाआड केले.
हा ट्रक वसमतहून नांदेडकडे जात होता. जिंतूर टि पॉर्इंटवर वसमत ग्रामीण पोलिसांचा कडक जागता पाहरा असतानाही ट्रक माळवटा शिवारापर्यंत गेला तरी खबर नव्हती. ती खबर एलसीबीला लागली व धान्याचा साठा पकडला. याप्रकरणातील माणिक उर्फ राजू खराटे (रा. कौठा), शेख इझरोद्दीन (रा. नांदेड) या दोन्ही आरोपीस न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आता या तस्करीत कोण प्रमुख गुन्हेगार आहेत, याचा तपास एलसीबीचे अधिकारी लावतात की नाही, हे पाहणे रंजक ठरणार आहे. शिवाय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: The accused in the case of wheat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.