कचरा टाकणाऱ्यावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 01:39 AM2018-05-14T01:39:22+5:302018-05-14T01:39:38+5:30

सावरकर चौकात कचरा टाकणारे दुकान मालक, कर्मचा-यांवर क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

The accused filed for the trash | कचरा टाकणाऱ्यावर गुन्हा दाखल

कचरा टाकणाऱ्यावर गुन्हा दाखल

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : सावरकर चौकात कचरा टाकणारे दुकान मालक, कर्मचा-यांवर क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहर सुंदर व स्वच्छ राहण्यासाठी मनपाने ओला व सुका कचरा गोळा करण्यासाठी रिक्षा लावल्या असून, सकाळी व रात्री सफाई केली जात आहे. रोड व सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नका, अशी जनजागृती निरालाबाजार,गुलमंडी, पैठणगेट परिसरात मनपाच्या वतीने केलेली आहे. दुकानदार व हॉटेल व्यावसायिकांनीच दोन वेगवेगळ्या बकेटमध्ये ओला व सुका कचरा जमा करून द्यावा.
वर्गीकरण करण्यास तो सोयीचा ठरेल आणि पर्यावरण राखण्यासाठी तसेच प्रदूषणदेखील होणार नाही. त्यासाठी तीन रिक्षा सकाळी व रात्री कचरा जमा करतात,असे असताना सावरकर चौकात दररोज काही दुकानदार कच-याच्या बॅगा टाकून पळून जात होते. स्वच्छता निरीक्षक सचिन मिसाळ यांनी व त्यांच्या टीमने लक्ष ठेवले. काही दुकानदार कचरा टाकला म्हणून दंडात्मक कारवाईला सामोरे गेले.

Web Title: The accused filed for the trash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.