पोलीस वाहनातून उडी घेऊन आरोपीचे पलायन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:02 AM2021-02-11T04:02:21+5:302021-02-11T04:02:21+5:30

औरंगाबाद : हातकडी बदलण्यात मग्न असलेल्या पोलिसांच्या हाताला झटका देऊन आरोपीने पोलीस व्हॅनमधून उडी घेत पलायन केल्याची खळबळजनक ...

The accused jumped out of the police vehicle and fled | पोलीस वाहनातून उडी घेऊन आरोपीचे पलायन

पोलीस वाहनातून उडी घेऊन आरोपीचे पलायन

googlenewsNext

औरंगाबाद : हातकडी बदलण्यात मग्न असलेल्या पोलिसांच्या हाताला झटका देऊन आरोपीने पोलीस व्हॅनमधून उडी घेत पलायन केल्याची खळबळजनक घटना बुधवारी दुपारी १२.४० वाजता मुकुंदवाडी पोलीस ठाण्यासमोर घडली.

अमर भाऊसाहेब गायकवाड (रा. मुकुंदवाडी) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी अमर याने मुकुंदवाडी गावातील मनपा शाळेजवळ वृध्दाला मारहाण करून त्यांच्या खिशातील २ हजार ७०० रुपये हिसकावून घेतले होते. मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी आरोपी अमर भाऊसाहेब गायकवाडला मंगळवारी रात्री अटक केली. रात्री त्याला एमआयडीसी, सिडको पोलीस ठाण्याच्या लॉक अपमध्ये ठेवले होते. पोलीस कर्मचाऱ्यांनी बुधवारी त्याला मोबाईल व्हॅनमधून मुकुंदवाडी ठाण्यात आणले. तेथे त्याची नोंद करून त्याला न्यायालयात हजर करणार होते. दुपारी १२.४० वाजता ठाण्यासमोरील पोलीस वाहनात त्याला पोलिसांनी बसविले. अमरने त्याच्या हातातील हातकडी फिट झाल्यामुळे टोचत असल्याची तक्रार सोबतच्या पोलिसांकडे केली. यामुळे पोलीस कर्मचारी त्याच्या एका हातातील हातकडी काढून दुसऱ्या हातात लावत होते. त्याने पोलिसांच्या हाताला झटका देऊन पोलीस व्हॅनमधून उडी घेतली आणि पलायन केले. पोलिसांनी आरडाओरड करीत त्याचा पाठलाग केला. मात्र, तो त्यांना चकवा देण्यात यशस्वी झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त, साहाय्यक आयुक्त आणि गुन्हे शाखा अधिकाऱ्यांनी मुकुंदवाडी ठाण्यात धाव घेतली. मुकुंदवाडी ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

=====

चौकट

आरोपी व्हाईटनरचा नशेडी

आरोपी गायकवाड हा व्हाईटनर आणि दारूची नशा करतो. व्हाईटनरची नशा केल्यावर तो कुणालाही जुमानत नाही. यातूनच त्याने वृध्दाला मारहाण करून लुटले.

Web Title: The accused jumped out of the police vehicle and fled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.