बलात्कारप्रकरणी आरोपीस जन्मठेप

By Admin | Published: March 19, 2016 12:14 AM2016-03-19T00:14:56+5:302016-03-19T00:58:27+5:30

अंबाजोगाई : सहा वर्षीय मुलीस बिस्किटच्या आमिषाने बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी रमेश मरीबा लांडगे (रा. पिसेगाव, ता. केज) यास दोषी ठरवून

Accused of life imprisonment for rape | बलात्कारप्रकरणी आरोपीस जन्मठेप

बलात्कारप्रकरणी आरोपीस जन्मठेप

googlenewsNext


अंबाजोगाई : सहा वर्षीय मुलीस बिस्किटच्या आमिषाने बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी रमेश मरीबा लांडगे (रा. पिसेगाव, ता. केज) यास दोषी ठरवून जन्मठेप व १४ हजार रुपये दंड, अशी शिक्षा येथील अप्पर जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.व्ही. हांडे यांनी शुक्रवारी ठोठावली.
पीडित मुलगी इयत्ता पहिलीच्या वर्गात (पिसेगाव ता. केज) येथे जि.प.शाळेत शिकते. १६ आॅगस्ट २०१३ रोजी ती घरासमोर खेळत होत्या. यावेळी आरोपी रमेश तिथे आला त्याने मुलीस ‘चल तुला बिस्किटपुडा देतो’, असे आमिष दाखवून जि.प.शाळेच्या मागे नेले व तिच्याशी कुकर्म केले. त्यानंतर तिला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. घरासमोर खेळणारी मुलगी खुप वेळेपासून दिसेना म्हणून तिची आजी शोध घेऊ लागली. यावेळी रमेश तिच्या नातीला समोरून घेऊन येत असल्याचे दिसला. त्यानंतर रमेशने तेथून पोबारा केला. मुलीने तिच्यासोबत घडलेला प्रकार आजीला सांगितला.
कुटुंबियांनी केज ठाणे गाठून फिर्याद दिली. उपअधीक्षक अभय डोंगरे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. अप्पर जिल्हा सत्र न्यायाधीश एस.व्ही. हांडे यांच्या न्यायालयासमोर सुनावणी झाली. सरकारी वकील लक्ष्मण फड यांनी आरोपी विरुद्ध ठोस पुरावे सादर केले.
साक्षीपुरावे ग्राह्य धरून रमेश लांडगे याला हांडे यांनी दोषी ठरवले. १४ वर्षे सक्तमजुरी व १४ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेतील १० हजार रुपये पीडित मुलीस देण्यास सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Accused of life imprisonment for rape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.