मुथुट दरोड्यातील आरोपींचा माग लागेना
By Admin | Published: May 16, 2016 12:13 AM2016-05-16T00:13:42+5:302016-05-16T00:21:18+5:30
औरंगाबाद : पोलीस निरीक्षकाच्या गणवेशात मुथुट फायनान्सवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींचा दुसऱ्या दिवशीही पोलिसांना माग लागला नाही.
औरंगाबाद : पोलीस निरीक्षकाच्या गणवेशात मुथुट फायनान्सवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींचा दुसऱ्या दिवशीही पोलिसांना माग लागला नाही.
अमरप्रीत चौकाजवळील जिल्हा दूध संघाच्या कार्यालयासमोरील मुथुट फायनान्सवर सकाळी साडेनऊ वाजता फिल्मी स्टाईल दरोडा टाकण्याचा सहा दरोडेखोरांचा प्रयत्न शनिवारी फसला होता. आरोपींपैकी एकजण पोलीस निरीक्षकाच्या गणवेशात होता. त्याच्याजवळ रिव्ल्हॉल्वरदेखील होते. मुथुट फायनान्सच्या कार्यालयात प्रवेश करताच काही छायाचित्रे दाखवून या व्यक्तींना सोने गहाण कर्ज दिले काय, अशी विचारणा करून त्यांनी लॉकर रूमपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. व्यवस्थापक रिना रेजी यांनी विरोध करताच त्यांना मारहाण करून ग्राहकांनी गहाण ठेवलेले दोन कोटी रुपयांचे सोने लुटण्याचा प्रयत्न दरोडेखोरांनी केला होता. दरोडेखोरांनी तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे वायर तोडले होते; परंतु कर्मचाऱ्यांनी अचानक अलार्म वाजविल्याने दरोडेखोर कारमधून पसार झाले होते.
जालना रस्ता, नगर रस्ता, जळगाव रस्ता व पैठण रस्त्यावरील टोलनाक्याचे सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात आले. याशिवाय क्रांतीचौक, बाबा पेट्रोलपंप, रेल्वेस्टेशन, महानुभाव आश्रम चौक येथील ‘सीसीटीव्ही’चे रेकॉर्ड तपासण्यात आले; परंतु संशयित कार एकाही कॅमेऱ्यात आढळून आली नाही.