आरोपींच्या मुसक्या आवळणार!
By Admin | Published: March 26, 2017 11:03 PM2017-03-26T23:03:45+5:302017-03-26T23:06:42+5:30
जालना : चंदनझिरा येथील एका महिला डॉक्टरच्या परिचित असलेल्या एका डॉक्टरने खोटे अश्लील व्हीडीओ इंटरनेटवर टाकण्याच्या धमकी देऊन देत ब्लॅकमेल करून पाच लाख रूपयांची खंडणी मागितली
जालना : चंदनझिरा येथील एका महिला डॉक्टरच्या परिचित असलेल्या एका डॉक्टरने खोटे अश्लील व्हीडीओ इंटरनेटवर टाकण्याच्या धमकी देऊन देत ब्लॅकमेल करून पाच लाख रूपयांची खंडणी मागितली. याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला संशयित हा दुसऱ्या जिल्ह्यातील संशयित आरोपी असल्याने त्याला अटक करण्यासाठी पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांच्याकडे कारवाईसाठी परवानगी मागितली असल्याची माहिती आहे.
ब्लॅकमेलिंगचा हा प्रकार तीन महिन्यांपासून सुरू होत. त्यामुळे वैतागलेल्या महिला डॉक्टरने अखेर शनिवारी चंदनझिरा पोलिसात तक्रार दिली. याप्रकरणी संशयित आरोपी डॉ. आरेफखान ताहेरखान (४०) याच्याविरूध्द चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परवानगी मिळताच संबंधित संशयित डॉक्टरला अटक करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी सांगत आहेत. सध्या संपूर्ण पोलीस यंत्रणा पोलीस भरती प्रक्रियेत गुंतल्याने विविध गुन्ह्यांच्या तपासावर परिणाम होत आहे. (प्रतिनिधी)