अॅसिड हल्ला पीडितही आता दिव्यांगच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 12:09 AM2017-11-01T00:09:42+5:302017-11-01T00:10:32+5:30
सिड हल्ल्यातील पीडित तसेच कमी उंची असलेल्या व्यक्ती, सिकलसेलचे रूग्ण, पार्किंसंन्स रोग, थॅलेसेमिया-हिमोफिलिया, बैनापन, मस्क्यूलर डिस्ट्रॉफी तसेच कुष्ठरोग या सर्व आजारांच्या रुग्णांना आता दिव्यांग व्यक्तींचा दर्जा देण्यात आला असून त्यांना अपंगत्वाच्या सवलती मिळणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : अॅसिड हल्ल्यातील पीडित तसेच कमी उंची असलेल्या व्यक्ती, सिकलसेलचे रूग्ण, पार्किंसंन्स रोग, थॅलेसेमिया-हिमोफिलिया, बैनापन, मस्क्यूलर डिस्ट्रॉफी तसेच कुष्ठरोग या सर्व आजारांच्या रुग्णांना आता दिव्यांग व्यक्तींचा दर्जा देण्यात आला असून त्यांना अपंगत्वाच्या सवलती मिळणार आहेत. केंद्र सरकारने अपंग व्यक्ती सुरक्षा कायद्यामध्ये अपंगत्वाच्या नवीन ९ प्रकारांचा समावेश केला आहे. त्यामुळे अपंग प्रवर्गाची संख्या आता २१ झाली आहे.
शासनाकडून दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच त्यांना विविध योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्या अनुषंगाने नुकत्याच झालेल्या समितीच्या बैठकीमध्ये दिव्यांग योजनेत पूर्वी न मोडणाºया नऊ प्रकारांच्या ‘अपंगत्वाचा’ सामावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता योजनेतील वर्गवारी वाढली आहे. शासनाकडून राबविल्या जाणाºया दिव्यांगासाठीच्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी समावेशित शिक्षण विभागातर्फे प्रयत्न केले जातात. चालू शैक्षणिक वर्षात जवळपास ३ हजारांच्या वर दिव्यांग विद्यार्थी शिक्षण आहेत. पूर्वी १२ प्रकारामध्ये मोडणाºया अपंगाना शासनाकडून सुविधा पुरविल्या जायच्या. परंतु आता शासन निर्णयात सुधारणा करून उच्चस्तरीय समितीच्या वतीने नवीन निर्णय घेण्यात आल्याने आता २१ प्रकारची वर्गवारी झाली आहे. बैठकीमधील चर्चेअंती विविध ९ प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींचा सामावेश करण्यात आला आहे. कार्यशाळेचे नियोजन करण्यात आले असून संबधित यंत्रणेस लवकरच सूचविले जाईल असे सुदाम गायकवाड यांनी सांगितले.