औरंगाबादेत खाजगी डॉक्टरांच्या सेवा अधिग्रहित; आपत्ती कायद्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 02:09 PM2020-09-12T14:09:04+5:302020-09-12T14:17:37+5:30

सदर डॉक्टर्सचे कामकाज व अन्य कार्यप्रणाली बाबींच्या अनुषंगाने मनपा आरोग्य अधिकाऱ्यांनी अटी, शर्ती निर्गमित कराव्यात, असे आदेशात नमूद आहे.

Acquired private doctor's services in Aurangabad; Collector's decision as per Disaster Act | औरंगाबादेत खाजगी डॉक्टरांच्या सेवा अधिग्रहित; आपत्ती कायद्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

औरंगाबादेत खाजगी डॉक्टरांच्या सेवा अधिग्रहित; आपत्ती कायद्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

googlenewsNext
ठळक मुद्देडॉक्टर्सना प्रतिमहा १ लाख २५ हजार रुपये मानधन निश्चित करण्यात आले...तर वैद्यकीय व्यवसाय नोंदणी रद्द

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात कोरोना विषाणूमुळे जास्त प्रमाणात रुग्ण बाधित होत असल्यामुळे शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा अपुरी पडत आहे. त्यामुळे शहरातील फ्रिलान्सिंंग व खाजगी व्यवसाय करणाऱ्या ७० च्या आसपास डॉक्टरांची सेवा मनपा व शासकीय रुग्णालयामध्ये अधिग्रहित करण्यात आली आहे. 

कायदेशीर तरतुदीनुसार इंडियन मेडिकल असोसिएशन अध्यक्षांनी जी यादी दिली आहे त्या यादीतील प्रथम  फ्रिलान्सिंग डॉक्टर्स व त्यानंतर अनुक्रमांकानुसार औरंगाबाद शहरामधील खाजगी व्यवसाय करणाऱ्या डॉक्टर्सच्या सेवा अधिग्रहित केल्या आहेत. दरमहा १५ दिवसांची शिफ्ट व ७ दिवसांचे अलगीकरण याप्रमाणे जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालयासाठी अधिग्रहित केल्या आहेत. डॉक्टर्सना प्रतिमहा १ लाख २५ हजार रुपये मानधन निश्चित करण्यात आले असून, त्यांच्या मानधनाचा खर्च राष्ट्रीय आरोग्य अभियान व तत्सम योजनांच्या उपलब्ध निधीतून भागविण्यात यावा. सदर डॉक्टर्सचे कामकाज व अन्य कार्यप्रणाली बाबींच्या अनुषंगाने मनपा आरोग्य अधिकाऱ्यांनी अटी, शर्ती निर्गमित कराव्यात, असे आदेशात नमूद आहे.

...तर वैद्यकीय व्यवसाय नोंदणी रद्द
खाजगी व्यावसायिक डॉक्टर्सनी मनपा आरोग्य अधिकाऱ्यांकडे तातडीने रुजू व्हावे. ते  रुजू झाले नाहीत, तर संबंधितांविरुद्ध साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ नुसार कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, तसेच संबंधित वैद्यकीय व्यावसायिकांचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्याबाबतची कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. 

Web Title: Acquired private doctor's services in Aurangabad; Collector's decision as per Disaster Act

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.