आरटीओ कार्यालयातर्फे २०२ वाहनांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:02 AM2021-01-08T04:02:16+5:302021-01-08T04:02:16+5:30
------------- ज्योतीनगरात वाहनचालकांना खड्ड्यांचा त्रास औरंगाबाद : ज्योतीनगरातील शहानूरमिया दर्गा मार्गाकडे जाणारा रस्ता सध्या खड्ड्यांच्या विळख्यात सापडला आहे. त्यातून ...
-------------
ज्योतीनगरात वाहनचालकांना खड्ड्यांचा त्रास
औरंगाबाद : ज्योतीनगरातील शहानूरमिया दर्गा मार्गाकडे जाणारा रस्ता सध्या खड्ड्यांच्या विळख्यात सापडला आहे. त्यातून वाहनचालकांना ये-जा करताना त्रास होत आहे. रस्त्याचे काम करावे अथवा किमान खड्डे बुजविण्यात यावे, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात आहे. मात्र, महापालिकेचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने परिसरातील नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.
-----------
शास्त्रीनगरातील उद्यानाकडे दुर्लक्ष
औरंगाबाद : शास्त्रीनगर परिसरातील ओंकारेश्वर मंदिराजवळील उद्यानाची गेल्या काही दिवसांपासून दुरवस्था झाली आहे. झाडी वाळून गेली आहे. खेळण्यांची अवस्थाही वाईट झाली आहे. याकडे लक्ष देऊन मनपाने उद्यानाचे सुशोभीकरण करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
-----------
एस.बी.एच. काॅलनीत पुलावरच कचरा पडून
औरंगाबाद : एस. बी. एच. काॅलनीत नाल्याच्या पुलावरच गेल्या अनेक दिवसांपासून कचऱ्याचे ढीग पडून आहेत. त्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे. परिसरात नियमितपणे कचरा उचलला जात नाही. रस्त्यावर कचरा फेकणाऱ्यांवर कारवाईही होत नाही. याकडे मनपाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
-----------
अग्निहोत्र चौकाला
खड्ड्यांचा विळखा
औरंगाबाद : जवाहर काॅलनी परिसरातील अग्निहोत्र चौकाला सध्या खड्ड्यांचा विळखा पडला आहे. या चौकातून मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा होते; परंतु रस्त्यावरील खड्डे बुजविण्याकडे महापालिकेचा कानाडोळा होत आहे.