४ महिन्यांत पकडले ६४ हजार नियमतोडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 12:58 AM2017-09-11T00:58:14+5:302017-09-11T00:58:14+5:30

चार महिन्यांत नियम मोडून वाहने पळविणाºया तब्बल ६४ हजार ३६४ वाहनचालकांना शहर वाहतूक शाखेने पकडून त्यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई केली

Action against 64 thousands traffic rule violence | ४ महिन्यांत पकडले ६४ हजार नियमतोडे

४ महिन्यांत पकडले ६४ हजार नियमतोडे

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहरात वाहतूक नियमांची ऐसीतैसी करीत वाहने पळविणाºयांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. चार महिन्यांत नियम मोडून वाहने पळविणाºया तब्बल ६४ हजार ३६४ वाहनचालकांना शहर वाहतूक शाखेने पकडून त्यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई केली. या वाहनचालकांकडून १ कोटी ९३ लाख ३ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला. एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहनचालकांवर कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त रामेश्वर थोरात यांनी सांगितले की, वाहतूक नियम तोडून वाहने पळविल्यामुळे अपघाताचा धोका अधिक असतो. यामुळे प्रत्येक वाहनचालकाने वाहतूक नियम पाळावेत, असे आवाहन पोलिसांकडून वारंवार करण्यात येते. एवढेच नव्हे, तर होर्डिंग लावून प्रबोधन केले जाते. मात्र काही लोकांना वाहतूक नियम मोडण्याची सवयच झाली आहे. अशा वाहनचालकांवर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश वाहतूक विभागाला पोलीस आयुक्त यशस्वी यादव आणि उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांनी दिले. या आदेशानुसार १ मे ते ३१ आॅगस्ट या चार महिन्यांत नियम मोडून वाहने पळविणाºया ६४ हजार ३६४ वाहनचालकांना पकडण्यात आले. या वाहनचालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करून तब्बल १ कोटी ९३ लाख ३ हजार ५०० रुपये वसूल करून शासनाच्या तिजोरीत जमा करण्यात आले. वाहतूक विभागाचे सहायक आयुक्त सी. डी. शेवगण यांच्या मार्गदर्शनाखाली शहर, सिडको, छावणी आणि वाळूज या वाहतूक विभागातर्फे ही कारवाई करण्यात आली.

Web Title: Action against 64 thousands traffic rule violence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.