लाच स्वीकारणाºया सहायकावर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 01:03 AM2017-09-09T01:03:26+5:302017-09-09T01:03:26+5:30
नाशिकला बदली झालेल्या शिक्षिकेला मूळ सेवापुस्तिका देण्यासाठी एक हजार रुपयांची लाच स्वीकारणाºया बदनापूर शिक्षणाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ सहाय्यकावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी कारवाई केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : नाशिकला बदली झालेल्या शिक्षिकेला मूळ सेवापुस्तिका देण्यासाठी एक हजार रुपयांची लाच स्वीकारणाºया बदनापूर शिक्षणाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ सहाय्यकावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी कारवाई केली. यशवंत संपतराव दाभाडे (५६, रा. सातारा परिसर, औरंगाबाद) असे लाच स्वीकारणाºया सहायकाचे नाव आहे.
शिक्षिकेच्या पतीने यासंबंधी तक्रार नोंदविली होती. पत्नीची जालन्याहून नाशिकला बदली झाल्यानंतर त्यांना ३ सप्टेंबर रोजी कार्यमुक्त करण्यात आले. शिक्षक पत्नीची सेवापुस्तिका नाशिकला पाठविण्यासाठी तक्रारदाराने यशवंत दाभाडे यांची बुधवारी भेट घेतली. तेव्हा या कामासाठी दाभाडे याने एक हजारांची लाच मागितली.
लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रादाराने शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेच्या मागणीची पडताळणी केल्यानंतर गटशिक्षणाधिकारी कार्यालयात सापळा लावून यशवंत दाभाडे यास एक हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ ताब्यात घेतले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक रवींद्र निकाळजे, पोलीस निरीक्षक व्ही. एल. चव्हाण, अशोक टेहरे, संतोष धायडे, प्रदीप दौंडे, संजय उदगीरकर, अमोल आगलावे, रामचंद्र कुदर, नंदू शेंडिवाले, रमेश चव्हाण, संदीप लव्हारे, खंदारे यांच्या पथकाने ही कारवाई केली. त्यामूळे शिक्षण विभागात खळबळ माजली आहे.