माळीवाड्यात बोगस डॉक्टरवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:03 AM2021-07-05T04:03:26+5:302021-07-05T04:03:26+5:30

खुलताबाद तालुक्यातील माळीवाडा गावातील एका इमारतीत बोगस डॉक्टर रुग्णांवर उपचार करीत असल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली. तालुका वैद्यकीय अधिकारी ...

Action against bogus doctor in Maliwada | माळीवाड्यात बोगस डॉक्टरवर कारवाई

माळीवाड्यात बोगस डॉक्टरवर कारवाई

googlenewsNext

खुलताबाद तालुक्यातील माळीवाडा गावातील एका इमारतीत बोगस डॉक्टर रुग्णांवर उपचार करीत असल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत दाते यांच्या मार्गदर्शनाखाली दौलताबाद प्रा. आ. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संग्राम बामणे, डॉ. आर. एस. वैष्णव, उल्का बनसोडे, एम. पी. कांबळे, मनीषा फुलर यांच्या पथकाने शुक्रवारी सापळा रचला. रुग्णास पाठवून तपासणी केल्यानंतर पथक घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा डॉक्टर म्हणून उपचार करणारा वासुदेव बाला याची तपासणी केली असता, त्याच्याकडे वैद्यकीय शिक्षणाची कोणतीही पदवी नव्हती. त्याच्याकडे ऑलोपॅथिक, आयुर्वेदिक, औषधी साठा आढळून आला. डॉ. प्रशांत दाते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दौलताबाद पोलीस ठाण्यात वासुदेव बालाविरोधात गुन्हा दाखल झाला. पुढील तपास पोउनि दिलीप बचाटे हे करीत आहेत.

----

बंगाली डॉक्टरांचा सुळसुळाट

दौलताबाद तालुक्यातील गावांमध्ये अशा बंगाली डॉक्टरांचा सुळसुळाट वाढलेला आहे. नाममात्र शुल्कात आरोग्य सेवा जरी मिळत असली तरी ते रुग्णांच्या जिवाशी खे‌ळत आहेत. अशा बंगाली डॉक्टरांवर क़डक कारवाई केली जावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.

Web Title: Action against bogus doctor in Maliwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.