बिडकीनमध्ये नियम तोडणाऱ्या दुकानांविरोधात कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:05 AM2021-05-08T04:05:06+5:302021-05-08T04:05:06+5:30
प्रशासनाने संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन, संचारबंदी लागू केली. मात्र, बऱ्याच दुकानदारांकडून आदेशाचे पालन होत नसल्याचे दिसून येत आहे. ...
प्रशासनाने संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन, संचारबंदी लागू केली. मात्र, बऱ्याच दुकानदारांकडून आदेशाचे पालन होत नसल्याचे दिसून येत आहे. अत्यावश्यक सेवेतील किराणा दुकान, भाजीपाला सकाळी सात ते अकरापर्यंत सुरू असताना बाजारपेठेतील कापड व्यापारी, इलेक्ट्रॉनिक, जनरल स्टोअर्स अशा दुकानांतून बंद शटरआड व्यवहार सुरू होता. बिडकीन येथे दोन इलेक्ट्रॉनिक व दोन कापड दुकानदारांनी नियमांचे उल्लंघन केल्याने या दुकानांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यावेळी दुकानदारांकडून प्रति एक हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. एका कापड दुकानात ३६ ग्राहक व १६ कर्मचारी आढळून आले. त्यास प्रतिव्यक्ती ५०० असा दंड ठोठावून या कलेक्शन सात दिवसांकरिता सील करण्यात आले. ही कारवाई उपविभागीय अधिकारी स्वप्निल मोरे, बिडकीन पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष माने, उपनिरीक्षक सुधाकर चव्हाण, राहुल पाटील, मंडळ अधिकारी शशिकांत ठेंगे, तलाठी संतोष बिरुटे, ग्रामसेवक नारायण पाडळे, कोतवाल किशोर अवचिंदे, आदींनी केली.
फोटो : बिडकीन येथे कापड दुकानदारांवर कारवाई करताना पथक.
070521\img_20210507_205511.jpg
बिडकीन येथे कापड दुकानदारांवर कारवाई करताना पथक.