नाल्यांवरील चार इमारतींवर कारवाई
By Admin | Published: May 10, 2016 12:43 AM2016-05-10T00:43:53+5:302016-05-10T00:43:53+5:30
औरंगाबाद : औषधी भवनसह चार इमारतींवर लवकरच कारवाई करण्यात येणार आहे. नाल्यावर व नाल्याच्या काठावर असलेल्या इमारतींची बांधकाम परवानगी तपासण्यात येतील
औरंगाबाद : औषधी भवनसह चार इमारतींवर लवकरच कारवाई करण्यात येणार आहे. नाल्यावर व नाल्याच्या काठावर असलेल्या इमारतींची बांधकाम परवानगी तपासण्यात येतील. औषधी भवन इमारतीच्या कराराचे नूतनीकरण भविष्यात अजिबात करण्यात येणार नाही, असा इशारा मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी दिला आहे.
बकोरिया म्हणाले की, औषधी भवनच्या इमारतीसंदर्भात आज एका शिष्टमंडळाने आपली भेट घेतली. नागरिकांना दरवर्षी त्रास होत असेल तर आम्हाला कारवाई करावी लागेल, असे मी त्यांना सांगितले आहे. औषधी भवनसह पीपल्स बँक, श्रीमान-श्रीमती, मराठा सेवा संघ या चार इमारतींवरदेखील कारवाई करावी लागेल. पाण्याला नैसर्गिक प्रवाह मिळवून देणे एवढाच आमचा उद्देश आहे. औषधी भवनच्या कराराची फाईल तपासण्यात येत असून कराराचे नूतनीकरण करण्यात येणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.
शहरात परिस्थिती गंभीर बनू शकते. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी नैसर्गिक प्रवाह मोकळा करणे गरजेचा आहे. नाल्यावरच्या व नाल्याच्या काठावर असलेल्या इमारतींची बांधकाम परवानगी तपासण्यात येणार आहे. या कामासाठी थोडा वेळ लागेल. टीडीआर घोटाळ्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. पोलीस आयुक्त अमितेशकुमार सुटीवर असून, ते परत आल्यानंतर या प्रकरणी चर्चा करण्यात येणार आहे.