मंगळसूत्र चोरांवर ‘मोक्का’ची कारवाई

By Admin | Published: July 15, 2015 12:32 AM2015-07-15T00:32:13+5:302015-07-15T00:42:14+5:30

औरंगाबाद : शेख इमरान ऊर्फ सुलतान या कुख्यात मंगळसूत्र चोराच्या टोळीवर ‘मोक्का’अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. इमरानच्या टोळीकडून एक लाख ८३ हजार रुपयांची

Action of 'Mookka' on Mangalsutra thieves | मंगळसूत्र चोरांवर ‘मोक्का’ची कारवाई

मंगळसूत्र चोरांवर ‘मोक्का’ची कारवाई

googlenewsNext


औरंगाबाद : शेख इमरान ऊर्फ सुलतान या कुख्यात मंगळसूत्र चोराच्या टोळीवर ‘मोक्का’अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. इमरानच्या टोळीकडून एक लाख ८३ हजार रुपयांची सोन्याची मंगळसूत्रे जप्त करण्यात आली आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही कारवाई केली. ‘सुपारी किलर’ इम्रान मेहदी हा तुरुंगात राहून इमरान टोळी चालवीत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
शेख इमरान ऊर्फ सुलतान (३५, रा. वाशी, ह.मु. कटकटगेट, औरंगाबाद), शेख शहेजाद शेख शमीम (३१, रा. सादाबनगर), शेख जावेद शेख मकसूद ऊर्फ टिपू (२१, रा. विजयनगर चौक, गारखेडा) आणि शेख इरफान शेख लाल (२०, रा. गारखेडा), अशी ‘मोक्का’ लावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
असा लागला छडा
ज्योतीनगर येथील रहिवासी मंगलाबाई देशमुख या २५ जून रोजी सकाळी फिरायला जात होत्या. त्याच वेळी दोन व्यक्ती मोटारसायकलवर आल्या. मंगलाबाई यांच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावून त्यांनी पळ काढला. या प्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखेचे फौजदार प्रशांत आवारे यांच्या पथकाने केलेल्या तपासात वरील आरोपींनी हा गुन्हा केल्याचे सिद्ध झाले.
आरोपींना अटक करून गुन्हा करण्यासाठी वापरलेली मोटारसायकल (एमएच-२०, बीके-१२१३) उस्मानपुरा पोलिसांच्या ताब्यात दिली होती. त्यानंतर उस्मानपुरा ठाण्याचे फौजदार अमोल देशमुख यांनी न्यायालयाच्या आदेशावरून ८ जुलै रोजी आरोपींची ओळख परेड घेतली होती. फिर्यादीने आरोपींना ओळखले. फिर्यादीची सोन्याची पोत शेख शहेजादकडून जप्त करण्यात आली.
या आरोपींनी जवाहरनगर ठाण्याच्या हद्दीत दोन, तर छावणी ठाण्याच्या हद्दीत एक गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपींकडून एक लाख ८३ हजार रुपये किमतीची मंगळसूत्रेही जप्त करण्यात आली.
शेख इमरान ऊर्फ सुलतान याने संघटित गुन्हेगारांची टोळी तयार केल्याचे तपासात आढळून आले. आरोपी साथीदारांसह त्याने गेल्या दहा वर्षांच्या काळात खून, खुनाचा प्रयत्न, दुखापत करणे, चोरी, जबरी चोरी, दरोडा, बेकायदा शस्त्र बाळगणे, फसवणूक करणे आदी २३ गुन्हे केल्याचे सिद्ध झाले.
४या प्रकरणांत आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्रेही दाखल करण्यात आली आहेत. सुलतान टोळीच्या कारवाईची पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गंभीर घेतली.

Web Title: Action of 'Mookka' on Mangalsutra thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.