नाईकवाडेंवर कारवाई कराच!
By Admin | Published: March 15, 2016 12:39 AM2016-03-15T00:39:19+5:302016-03-15T00:39:19+5:30
औरंगाबाद : सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयातील रेणू बिबट्याचे तीन बछडे मागील आठवड्यात मरण पावले. या गंभीर घटनेप्रकरणी प्राणिसंग्रहालय
औरंगाबाद : सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयातील रेणू बिबट्याचे तीन बछडे मागील आठवड्यात मरण पावले. या गंभीर घटनेप्रकरणी प्राणिसंग्रहालय संचालक डॉ. बी.एस. नाईकवाडे यांच्यावर कठोर कारवाई करा, अशी सूचना सोमवारी मनपा पदाधिकाऱ्यांनी आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांना केली. आयुक्तांनी नेमलेल्या समितीने अजून प्रशासनाला अहवाल दिलेला नाही. अहवाल प्राप्त होताच कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
रेणू या बिबट्या मादीने तीन पिलांना जन्म दिल्यावर मनपाच्या प्राणिसंग्रहालयाने वन विभागाला माहिती देणे गरजेचे होते. प्राणिसंग्रहालयाने ही माहिती दडवून ठेवली. नंतर पिलांना दोन दिवस अन्न-पाणी न मिळाल्याने ती मरण पावली. दरम्यान, सोमवारी सकाळी महापौर त्र्यंबक तुपे यांनी एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत मनपा आयुक्तांसह इतर अधिकारीही उपस्थित होते. बछड्यांच्या मृत्यू प्रकरणात प्राणिसंग्रहालय संचालक डॉ. नाईकवाडे यांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांची बाजू कोणालाही पटणारी नव्हती. शेवटी सर्व पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांकडे नाईकवाडे यांच्यावर कारवाई करावी, अशी सूचना केली.
महापालिकेत रिक्त असलेले ३३६ पदे त्वरित भरण्यासाठी प्रशासनाने निर्णय घ्यावा.
४मालमत्ता कर लावण्यासाठी खाजगी संस्थेला त्वरित नेमण्यासंदर्भात निविदा प्रक्रिया सुरू करावी.
४मराठवाडा मुक्तिसंग्राम येथील पहिला मजला बांधण्यासाठी कामाला त्वरित गती द्यावी.
४सलीम अली अथवा कमल तलाव सुशोभीकरणाचा प्रस्ताव नियोजन समितीला त्वरित द्यावा.
४रस्त्यांच्या कामांना त्वरित गती देण्यासंदर्भात पाऊल उचलावे.
४शासन निधीतून शहरात विविध भागात दहा आरोग्य केंद्रे स्थापन करण्यासाठी जागा निश्चित.
४नेहरूनगर येथील रुग्णालयाची डागडुजी करण्यासाठी निविदा काढण्याचे आदेश.