वेळेत न आल्यास डॉक्टरांवर होणार कारवाई
By Admin | Published: June 20, 2017 11:47 PM2017-06-20T23:47:21+5:302017-06-20T23:50:27+5:30
बीड : जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर वेळेत येत नसल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर वेळेत येत नसल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. याचीच दखल घेत मंगळवारी जिल्हा शल्य चिकित्सक यांनी सर्व डॉक्टरांना नोटीस बजावून वेळेत येण्याच्या सूचना दिल्या. वेळेत न आल्यास कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.
३२० खाटांच्या रुग्णालयात अपुरे मनुष्यबळ आहे. त्यातच उपलब्ध डॉक्टर मनमानी कारभार चालवत आहेत. रुग्णालयात वेळेत येत नसल्यामुळे ग्रामीण भागातून आलेल्या रूग्णांना ताटकळत बसावे लागत आहे. यामुळे सर्वसामान्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत होता. याचीच दखल घेत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागेश चव्हाण यांनी सर्व डॉक्टरांना मंगळवारी नोटीस बजावल्या आहेत. यामध्ये वेळेत येण्यासह सर्वांनी अॅप्रन घालणे, ओळखपत्र गळ्यात ठेवणे बंधनकारक असल्याचे म्हटले आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास कठोर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला आहे. आता या नोटीसचा डॉक्टरांवर किती परिणाम होतो? हे येणारी वेळच ठरवेल.