अवैध वाळू उपस्याविरोधात थेट नदी पात्रातच धाड, उपविभागीय अधिका-यांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 03:06 PM2017-07-21T15:06:09+5:302017-07-21T15:07:37+5:30
सेनगाव तालुक्यातील ब्रम्हवाडी येथे अवैध वाळू उपसा करणा-या वाळू माफियां विरोधात उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर थेट पूर्णा नदी पात्रातच धाड टाकली.
ऑनलाईन लोकमत
हिगोली/ सेनगाव : सेनगाव तालुक्यातील ब्रम्हवाडी येथे अवैध वाळू उपसा करणा-या वाळू माफियां विरोधात उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर थेट पूर्णा नदी पात्रातच धाड टाकली. गुरुवारी सायंकाळी उशिरा झालेल्या या धडाकेबाज कारवाईत २ पथकांचा समावेश होता.
या कारवाईत १ पोकलेन मशिनसह २ टिप्पर व २ ट्रक्टर जप्त करण्यात आले. यावेळी २ ट्रक्टर पसार होण्यास यशस्वी ठरली. या वाहनावर सुद्धा लवकरच पोलिस कारवाई करण्यात येईल अशी माहिती सेनगाव पोलिसांनी दिली. तसेच जप्त करण्यात आलेल्या वाहनावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे तहसीलदार वैशाली पाटिल यांनी सांगितले.