कारवाईस मिळेना जि.प.ला मुहूर्त !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2017 12:02 AM2017-01-07T00:02:40+5:302017-01-07T00:03:24+5:30
बीड : सरकारी काम अन् सहा महिने थांब ही प्रशासनातील उणीव सांगणारी म्हण सध्या जि.प. मध्ये तंतोतंत लागू पडत आहे.
बीड : सरकारी काम अन् सहा महिने थांब ही प्रशासनातील उणीव सांगणारी म्हण सध्या जि.प. मध्ये तंतोतंत लागू पडत आहे. विशेष म्हणजे यात शिक्षण विभाग अग्रेसर असून, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन, बेकायदेशीर दर्जावाढ व संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना मूळ ठिकाणी पाठविण्यास जि.प.ला मुहूर्त सापडत नाही. परिणामी शिक्षकांचे प्रश्न कायम असून, जि.प.च्या वेळकाढूपणाबद्दल संताप व्यक्त होत आहे.
बेकायदेशीर दर्जावाढ प्रकरण दोन वर्षांपासून, अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न आठ महिन्यांपासून, तर संच मान्यतेत अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना मूळ जागी पाठवण्याचा प्रश्न तीन महिन्यांपासून प्रलंबित आहे. २०१५-१६ च्या संच मान्यतेनुसार प्राथमिक व माध्यमिक विभागात अतिरिक्त शिक्षकांचे आॅनलाईन समायोजन केले होते. (प्रतिनिधी)