तांत्रिक सल्लागारांवर कारवाई अटळ
By Admin | Published: June 28, 2017 12:44 AM2017-06-28T00:44:42+5:302017-06-28T00:50:57+5:30
औरंगाबाद : भारत निर्माण कार्यक्रमांतर्गत पाणीपुरवठा योजनांच्या कामांमध्ये अनियमितता करणाऱ्या ग्राम पाणीपुरवठा समितीच्या अध्यक्ष व सचिवांवर कारवाई होते, मग तांत्रिक सल्लागारांवर का नाही,
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : भारत निर्माण कार्यक्रमांतर्गत पाणीपुरवठा योजनांच्या कामांमध्ये अनियमितता करणाऱ्या ग्राम पाणीपुरवठा समितीच्या अध्यक्ष व सचिवांवर कारवाई होते, मग तांत्रिक सल्लागारांवर का नाही, अनेक वर्षे योजनेची कामे अपूर्ण ठेवणाऱ्या कंत्राटदारांना लावण्यात येणारा दंडही जुजबी आकारला जातो. यामध्ये बदल करावा लागेल. यासंदर्भात लवकरच एक विशेष पथक स्थापन करून पाणीपुरवठा योजनांची पाहणी केली जाईल. यामध्ये दोषी आढळून येणाऱ्या तांत्रिक सल्लागारांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांनी स्थायी समितीमध्ये दिली.
जि. प. अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी स्थायी समितीची तहकूब सभा झाली. या सभेत सदस्य अविनाश गलांडे, किशोर बलांडे, किशोर पवार, मधुकर वालतुरे आदींनी प्रशासनाला जाब विचारला की, जिल्ह्यात भारत निर्माण कार्यक्रमांतर्गत कोट्यवधी रुपयांचा निधी खर्चूनदेखील आजही अनेक गावे तहानलेलीच आहेत. अनेक योजना अपूर्ण आहेत. यामध्ये पाणीपुरवठा समितीच्या अध्यक्ष- सचिवांना दोषी धरून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. अनेक ठिकाणी त्यांच्यावर गुन्हेदेखील दाखल झाले आहेत. मात्र, पाणीपुरवठा योजनांच्या कामांसाठी नेमलेल्या तांत्रिक सल्लागारांविरुद्ध कारवाई का केली जात नाही,