सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्यांवर होणार कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 10:35 PM2018-11-02T22:35:47+5:302018-11-02T22:36:04+5:30
औरंगाबाद : सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाºयांविरोधात सिगारेट-तंबाखूजन्य पदार्थ विक्री प्रतिबंध कायदा (कोटपा-२००३) अंतर्गत कडक कारवाई करण्याचे आदेश अधिकाºयांना देण्यात आले असून, या कारवाईचा आढावा दर आठवड्याला घेतला जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी दिली.

सार्वजनिक ठिकाणी, तसेच शाळा परिसरात खुलेआम विडी-सिगारेट ओढणे, तसेच तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध विक्रीवर नियंत्रण आणण्यासाठी तंबाखूमुक्त महाराष्ट्र अभियान राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत सिगारेट-तंबाखूजन्य पदार्थ विक्री कायदा -२००३ ( कोटपा )च्या अंमलबजावणीसंदर्भात शुक्रवारी औरंगाबाद ग्रामीण पोलिसांची कार्यशाळा पोलीस अधीक्षक कार्यालयात घेण्यात आली.
यावेळी अध्यक्षस्थानी पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह होत्या, त्यावेळी त्या बोलत होत्या. अपर पोलीस अधीक्षक (ग्रामीण) उज्ज्वला वनकर, संबंध हेल्थ फाऊंडेशन संस्थेचे व्यवस्थापक देवीदास शिंदे, कर्क रोगतज्ज्ञ डॉ. विराज बोरगावकर, अन्न सुरक्षा अधिकारी निरुपमा महाजन, श्रीकांत जाधव, सहायक पोलीस निरीक्षक साईनाथ रामोड उपस्थित होते.
यावेळी शिंदे यांनी ‘कोटपा’ कायदा आणि त्यातील विविध कलमांची अंमलबजावणी यासंदर्भात, तर कर्क रोगतज्ज्ञ डॉ. विराज बोरगावकर यांनी तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे होणाºया ‘कर्क रोग आणि त्यांचे परिणाम’ याविषयी उपस्थितांशी संवाद साधला. औरंगाबाद जिल्हा ग्रामीण पोलीस दलातील विविध ठाण्यांचे प्रमुख आणि अन्य अधिकारी- कर्मचारी यांची कार्यशाळेला उपस्थिती होती.