आंबेडकरी चळवळीतील शिलेदारांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 01:03 AM2018-07-09T01:03:39+5:302018-07-09T01:03:47+5:30
ईएसच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त आज सकाळी मानवमुक्ती आंबेडकरी चळवळीतील शिलेदारांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या सभागृहात हृद्य सत्कार करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : पीईएसच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त आज सकाळी मानवमुक्ती आंबेडकरी चळवळीतील शिलेदारांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या सभागृहात हृद्य सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांची उपस्थिती होती, तर अध्यक्षस्थानी पीईएसचे अध्यक्ष डॉ. एस.पी. गायकवाड हे होते.
प्रारंभी महामानवांच्या मूर्तींना अभिवादन केल्यानंतर व बुद्धवंदना झाल्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात झाली. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रात आंबेडकरी विचाराला आपल्या जीवनाचे ध्येय मानून जगलेले समता सैनिक म्हणून शाल, सन्मानचिन्ह व बुके देऊन झालेल्या या सत्कारात डॉ. उपगुप्त भन्ते, माजी न्यायाधीश डी.आर. शेळके, अॅड. एस.आर. बोदडे, प्रा. डॉ. वासुदेव मुलाटे, प्रा. डॉ. प्रल्हाद लुलेकर, प्राचार्य सर्जेराव ठोंबरे, प्रा. डॉ. सुशीला मूल-जाधव, प्रा. डॉ. स्मिता अवचार, जनार्दन म्हस्के, प्रा. प्रकाश वराळे, प्राचार्य डॉ. प्रदीप दुबे, प्राचार्य डॉ. जे.एस. खैरनार, नाटककार प्रकाश त्रिभुवन, प्रा. डॉ. प्रकाश शिरसाठ, नंदकुमार नाईक, भीमराव सरवदे, सुधाकर झिने, इंजि. बाबूराव आदमाने, डॉ. मिलिंद रणवीर आदींचा समावेश होता. ज्येष्ठ रंगकर्मी त्र्यंबक महाजन, किशोर शितोळे व प्राचार्य डॉ. कल्याण लघाने हे काही अपरिहार्य कारणास्तव सत्कारास उपस्थित राहू शकले नाहीत. प्रा. प्रज्ञा साळवे यांनी सत्कारमूर्तींचा परिचय करून दिला. प्रारंभी, महाविद्यालयाचे प्राचार्य किशोर साळवे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. प्रतिभा देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. राजेंद्र म्हस्के यांनी आभार मानले. मिलिंद कला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली प्रधान, पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभिजित वाडेकर, मिलिंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.डी. राठोड, पीईएस पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य टी.ए. कदम, मिलिंद मल्टिपर्पज हायस्कूलच्या मुख्याध्यापिका ए.पी. गोलकोंडा, मातोश्री रमाबाई आंबेडकर हायस्कूलच्या मुख्याध्यापिका जयश्री घोबले यांची यावेळी उपस्थिती होती. याचवेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.