पँथर चळवळीतील कार्यकर्त्यांचा होणार सन्मान; रामदास आठवलेंच्या हस्ते उद्या पुरस्कार वितरण

By विजय सरवदे | Published: October 13, 2023 04:29 PM2023-10-13T16:29:35+5:302023-10-13T16:30:01+5:30

या मेळाव्याचे उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी रिपाइंचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबूरावजी कदम असतील.

Activists of the Panther Movement will be honoured; Award distribution tomorrow by Ramdas Athawale | पँथर चळवळीतील कार्यकर्त्यांचा होणार सन्मान; रामदास आठवलेंच्या हस्ते उद्या पुरस्कार वितरण

पँथर चळवळीतील कार्यकर्त्यांचा होणार सन्मान; रामदास आठवलेंच्या हस्ते उद्या पुरस्कार वितरण

छत्रपती संभाजीनगर : दलित पँथर सुवर्ण महोत्सव समितीच्या वतीने १४ ऑक्टोबर रोजी शनिवारी आमखास मैदानावर मेळावा आयोजित करण्यात आला असून या मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे. या समारंभात पँथर चळवळीत योगदान दिलेल्या कार्यकर्त्यांना दलित पँथर गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

या मेळाव्याचे उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी रिपाइंचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबूरावजी कदम असतील. यावेळी आंबेडकरी विचारवंत व साहित्यिक अर्जुन डांगळे, शरणकुमार लिंबाळे, डॉ. ऋषीकेश कांबळे तसेच दिवाकर शेजवळ, प्रदेशाध्यक्ष राजा सरवदे, ऐक्यवादी रिपाइंचे दिलीप जगताप, गौतम सोनवणे, मिलिंद शेळके, दौलत खरात, ब्रह्मानंद चव्हाण, विजय सोनवणे, पप्पू कागदे, किशोर थोरात, डी.एन. दाभाडे, चंद्रकांत चिकटे, राजा ओहळ, सिद्धार्थ भालेराव, भास्कर रोडे, संजय बनसोडे आदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला आंबेडकरी चळवळीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संजय ठोकळ, नागराज गायकवाड, राकेश पंडित, अरविंद अवसरमल, दिलीप पाडमुख, विजय मगरे, लक्ष्मण हिवराळे, प्रवीण नितनवरे, अमोल नरवडे, मनोज सरीन, देवराज वीर, मधुकर चव्हाण यांनी केले आहे.

पँथर गौरव पुरस्काराचे मानकरी
गंगाधर गाडे, ॲड. प्रीतमकुमार शेगावकर (मरणोत्तर), बाबूराव कदम, मिलिंद शेळके, दिनकर ओंकार, दौलत खरात, प्रकाश निकाळजे, रतन पंडागळे, उत्तम शिंदे, प्रियानंद शिंदे (मरणोत्तर), रमेश खंडागळे, दादाराव काळे, सीताराम गारदे, मधुकर चांदणे (मरणोत्तर), प्रकाश जावळे (मरणोत्तर), लक्ष्मण मगरे, धाराशिवचे यशपाल सरवदे (मरणोत्तर), बाळासाहेब कदम, आनंद पंडागळे, लातूरचे टी.एम. कांबळे (मरणोत्तर), भाऊसाहेब वाघंबर (मरणोत्तर), अनंत लांडगे, रामराव गवळी, रफीक अहमद (मरणोत्तर), बीडचे मुरलीधर वडमारे (मरणोत्तर), जालनाचे ब्रह्मा आढाव, नांदेडचे एस.एम. प्रधान (मरणोत्तर), बालाजी धरसरे, चंद्रकांत ठाणेकर, नारायण गायकवाड, परभणीचे ॲड. लक्ष्मण बनसोड, माधव हातागळे, राणूबाई वायवळ आदी पँथर गौरव पुरस्काराचे मानकरी आहेत.

Web Title: Activists of the Panther Movement will be honoured; Award distribution tomorrow by Ramdas Athawale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.