आदर्श पतसंस्थेच्या घोटाळ्याचा मास्टरमाइंड पोलिसांच्या जाळ्यात

By राम शिनगारे | Published: August 7, 2023 12:02 PM2023-08-07T12:02:24+5:302023-08-07T12:03:15+5:30

घोटाळ्याचा प्लॅन देणाऱ्या आरोपीस बेड्या; मुंबईतून शहरात परतल्यानंतर पोलिसांनी पकडले

Adarsh Credit society scam mastermind arrested by police | आदर्श पतसंस्थेच्या घोटाळ्याचा मास्टरमाइंड पोलिसांच्या जाळ्यात

आदर्श पतसंस्थेच्या घोटाळ्याचा मास्टरमाइंड पोलिसांच्या जाळ्यात

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेतील कर्ज घोटाळ्याच्या मास्टरमाइंडला शहर पोलिसांच्या विशेष पथकाने एका हॉटेलमध्ये बेड्या ठोकल्या. या आरोपीने अध्यक्ष अंबादास मानकापे याच्यासह इतरांना घोटाळा करण्याचा प्लॅन दिल्याची माहिती आरोपींच्या चौकशीतून समोर आली होती. तेव्हापासून मास्टरमाइंड मुंबई, पुणे अशा विविध शहरांमधील आलिशान हॉटेलमध्ये लपून बसत होता. शनिवारी शहरात आल्यानंतर सिडको परिसरातील एका हॉटेलमध्ये असतानाच त्यास पकडले. या घोटाळ्यात पोलिसांनी सहाव्या आरोपीला अटक केला आहे.

नामदेव दादाराव कचकुरे (५२, रा.शेंद्रा) असे अटक आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदर्श नागरी पतसंस्थेत २०२ कोटींच्या घोटाळ्यात अध्यक्ष अंबादास मानकापे याच्यासह इतर पाच जणांना शहर पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली आहे. अटक केलेल्या दोन आरोपींनी पोलिसांच्या चौकशीत नामदेव कचकुरे हा सर्व घोटाळ्याचा मास्टरमाइंड असल्याची माहिती दिली होती. तेव्हापासून पोलिस त्याच्या मागावर होते. मात्र, तो फरार होता. मुंबईतील एका आलिशान हॉटेलमध्ये राहत होता. तेथून शनिवारी सकाळी कचकुरे हा शहरातील सिडको भागातील एका हॉटेलमध्ये उतरला. त्याची माहिती पोलिसांच्या विशेष पथकाला मिळताच, सहायक निरीक्षक सय्यद मोसीन, उपनिरीक्षक कल्याण शेळके, अजित दगडखैरे, सहायक फाैजदार हबीब शेख, हवालदार शिवाजी भोसले, अजय दहिवाल यांनी हॉटेलवर छापा मारला. तेव्हा त्या ठिकाणी नामदेव कचकुरे हा सापडला. त्यास सिडको ठाण्यात आणल्यानंतर गुन्ह्यात आरोपी करून अटक केली आहे.

बनावट कर्ज प्रकरणात पटाईत
नामदेव कचकुरे हा आदर्श नागरी पतसंस्थेच्या शेंद्रा येथील शाखेत कर्ज प्रकरणे पाहणारा कर्मचारी होता. त्या ठिकाणीच त्याने बनावट कागदपत्रे, संपत्ती दाखवून कर्ज मंजूर करण्याची योजनाच अध्यक्ष मानकापे याच्यासह दोन संचालकांनी सांगितली. त्यानुसार, २०२ कोटी रुपयांचे बनावट कर्जांचे वाटप केल्याचे अटकेतील व्यक्तींनी कबुली पोलिसांकडे दिली होती. त्याचा मास्टरमाइंड हा कचकुरेच असल्याचे पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले.

कचकुरेची पत्नी शेंद्रयाची सरपंच
शहर पोलिसांनी अटक केलेल्या नामेदव कचकुरे याची पत्नी शेंद्रा ग्रामपंचायतीची विद्यमान सरपंच असल्याची माहिती पोलिसांनी दिली. नामेदव हा ‘एनडी’ या नावानेच फेमस असून, आदर्श पतसंस्थेत त्याचीच चलती होती, अशीही माहिती समोर आली आहे.

Web Title: Adarsh Credit society scam mastermind arrested by police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.