आदर्श जैनने ठोकल्या ६७ चेंडूंत ११५ धावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 01:16 AM2019-02-20T01:16:59+5:302019-02-20T01:17:27+5:30
नवल टाटा स्टेडियमवर सुरूअसलेल्या डॉ. रफिक झकेरिया १४ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत गुरुकुल आॅलिम्पियाडच्या आदर्श जैन याने चौफेर टोलेबाजी करताना झंझावाती शतकी खेळी केली. त्याच्या शतकी खेळीच्या बळावर गुरुकुल आॅलिम्पियाड संघाने शुक्ला अकॅडमीचा तब्बल ११६ धावांनी पराभव केला.
औरंगाबाद : नवल टाटा स्टेडियमवर सुरूअसलेल्या डॉ. रफिक झकेरिया १४ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत गुरुकुल आॅलिम्पियाडच्या आदर्श जैन याने चौफेर टोलेबाजी करताना झंझावाती शतकी खेळी केली. त्याच्या शतकी खेळीच्या बळावर गुरुकुल आॅलिम्पियाड संघाने शुक्ला अकॅडमीचा तब्बल ११६ धावांनी पराभव केला.
आदर्श जैन याने ६७ चेंडूंतच तडाखेबंद फलंदाजी करताना २0 चौकारांसह ११५ धावांची स्फोटक खेळी केली. त्याच्या शतकी खेळीच्या बळावर गुरुकुल आॅलिम्पियाड संघाने प्रथम फलंदाजी करताना २0 षटकांत ३ बाद २0८ असा धावांचा डोंगर रचला. आदर्श जैन याला सुरेख साथ देताना सारंगने २५ चेंडूंत ७ चौकार व एका षटकारासह ४४ धावांची आक्रमक खेळी केली. राजेश बोराडेने १९ धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरात शुक्ला अकॅडमीचा संघ १९.२ षटकांत ९२ धावांत गारद झाला. विशेष म्हणजे महायान अकॅडमीविरुद्धही आदर्श जैन याने ३६ चेंडूंत ९ चौकारांसह ५४ धावा केल्या होत्या. हा सामनाही गुरुकुल आॅलिम्पियाड संघाने ८ गडी राखून जिंकला होता. या सामन्यात ओंकार माने याने २१ धावांत ३ गडी बाद करीत आॅलिम्पियाड संघाच्या विजयात निर्णायक योगदान दिले.