‘आदर्श’ने उचलली रेणुकाच्या शिक्षणाची जबाबदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 12:12 AM2017-08-19T00:12:27+5:302017-08-19T00:12:27+5:30
सेनगाव येथील रेणूका तिडकेने मोलमजुरी करुन इयत्ता दहावीमध्ये ९२.४० टक्के गुण घेतले. त्यामुळे तिचे सर्वच स्तरातून कौतूक झाल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाले होते. परंतु आर्थिक परिस्थितीमुळे रेणूकाच्या आई- वडिलांना पुढील शिक्षणाची चिंता भेडसावत होती. तोच आदर्श महाविद्यालयातील शिक्षकवृंदाने रेणूकाच्या कुटुंबियाची भेट घेऊन रेणूकाच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी उचलल्यामुळे रेणूकाने ‘लोकमत’चे आभार मानले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : सेनगाव येथील रेणूका तिडकेने मोलमजुरी करुन इयत्ता दहावीमध्ये ९२.४० टक्के गुण घेतले. त्यामुळे तिचे सर्वच स्तरातून कौतूक झाल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाले होते. परंतु आर्थिक परिस्थितीमुळे रेणूकाच्या आई- वडिलांना पुढील शिक्षणाची चिंता भेडसावत होती. तोच आदर्श महाविद्यालयातील शिक्षकवृंदाने रेणूकाच्या कुटुंबियाची भेट घेऊन रेणूकाच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी उचलल्यामुळे रेणूकाने ‘लोकमत’चे आभार मानले.
रेणूका अगदी लहानपणापासूनच अभ्यासात हुशार आहे. परंतु घरची हलाखीची परिस्थिती असल्याने तिनेही आपल्या आई- वडिलासोबत रोजमजुरीचे काम करुन शाळा शिकली. आपल्या अभ्यासाच्या जोरावर तिने इयत्ता दहावीत ९२.४० टक्के गुण घेतल्याने तिचे सर्वत्र कौतुक झाले. विशेष म्हणजे जि. प. सीईओ डॉ. एच. पी. तुम्मोड यांनीही प्रत्यक्ष रेणूकाची भेट घेऊन शिक्षणासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले होते. त्याच अनुषंगाने आदर्श महाविद्यालयाचे संस्थाअध्यक्षांनी विद्यार्थिनीच्या शिक्षणाची जाबबदारी उचलण्याची तयारी दाखविल्यानंतर जुक्टा संघटनेचे अध्यक्ष प्रा. ए. एस. पांपटवार, एन. एस. रहिलवार, प्रा. राम तोडकर, पडोळे, कांप्रतवार यांनी रेणूकाची भेट घेऊन तिचा ११ विज्ञानला निशुल्क प्रवेश करुन घेतला. शिवाय तिला वह्या, पुस्तकेही उपलब्ध करुन देत तिच्या दोन वर्षे शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे. विशेष म्हणजे प्राचार्य डॉ. ए. आर. लाठी आणि उपप्राचार्य सामलेटी, पर्यवेक्षिका इंदानी यांनी प्रवेशासाठी पाठपुरावा केला. तर ‘लोकमत’मुळे एका हुशार व होतकरु विद्यार्थिनीचा आधार बनता आल्याचे जुक्टा संघटनेचे अध्यक्ष ए. एस. पांपटवार यांनी सांगितले. यातून खरोखरच विद्याििर्थनीला जिवनात यश मिळण्यास मदत होईल.