१०४ नव्या बाधितांची भर, १ मृत्यू, १७२ जणांना सुटी

By | Published: December 5, 2020 04:06 AM2020-12-05T04:06:45+5:302020-12-05T04:06:45+5:30

औरंगाबाद : जिल्ह्यात १०४ कोरोनाबाधितांची भर पडली, तर एका बाधिताचा उपाचारदरम्यान मृत्यू झाला. दिवसभरात १७२ रुग्णांचे उपचार पूर्ण झाल्याने ...

Addition of 104 new victims, 1 death, 172 people discharged | १०४ नव्या बाधितांची भर, १ मृत्यू, १७२ जणांना सुटी

१०४ नव्या बाधितांची भर, १ मृत्यू, १७२ जणांना सुटी

googlenewsNext

औरंगाबाद : जिल्ह्यात १०४ कोरोनाबाधितांची भर पडली, तर एका बाधिताचा उपाचारदरम्यान मृत्यू झाला. दिवसभरात १७२ रुग्णांचे उपचार पूर्ण झाल्याने त्यांना विविध रुग्णालयांतून सुटी देण्यात आली. यात शहरातील १५६, तर ग्रामीणमधील १६ जणांचा समावेश होता.

एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४३ हजार ७६० झाली आहे. आजपर्यंत ४१ हजार ६८० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. आतापर्यंत एकूण १,१५४ जणांचा मृत्यू झाल्याने एकूण ९२६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर घाटीत बीड बायपास देवळाई येथील ७७ वर्षीय महिला कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

मनपा क्षेत्रात ८५ रुग्ण

पुष्पनगरी समर्थनगर १, सातारा परिसर १, वर्धमान रेसिडेन्सी, गारखेडा १, श्रीकृष्णनगर, एन ९ येथील १, नंदनवन कॉलनी, छावणी १, विठ्ठलनगर, मुकुंदवाडी १, कांचननगर, पैठण रोड परिसर १, मोतीवाला कॉलनी, चिकलठाणा १, रेणुकानगर, शिवाजीनगर १, उल्कानगरी १, यशोधरा कॉलनी, सिडको १, नवनाथनगर, हडको १, एन-९ हडको १, गुलमोहर कॉलनी, एन ५ सिडको १, दिशानगरी १, मल्हार चौक १, गजानन कॉलनी १, भानुदासनगर १, स्वप्ननगर १, एन ४ सिडको २, म्हाडा कॉलनी १, बीड बायपास परिसर १, छावणी पोलीस स्टेशन १, स्नेहनगर, क्रांती चौक परिसर १, संत गाडगे महाराज शहरी बेघर निवास, रेल्वेस्टेशन १, कांचनवाडी ३, एन ८ सिडको १, राजेशनगर बीड बायपास १, सद्गुरू कृपा हौसिंग सो. १, गारखेडा परिसर १, बीड बायपास परिसर १, अन्य ५१ बाधित आढळून आले.

ग्रामीण भागात १९ रुग्ण

वाहेगाव, गंगापूर १, वासडी, कन्नड १, करमाड १, मल्हारवाडी ३, लासूर स्टेशन १, शिवूर बंगला, वैजापूर १, फुलंब्री पोलीस स्टेशन १, जानेफळ १, अन्य ९ रुग्ण आढळले.

Web Title: Addition of 104 new victims, 1 death, 172 people discharged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.