जिल्ह्यात ११६ नव्या रुग्णांची वाढ
By | Published: December 2, 2020 04:04 AM2020-12-02T04:04:58+5:302020-12-02T04:04:58+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यात रविवारी दिवसभरात ११६ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आणि उपचार पूर्ण झालेल्या ६७ रुग्णांना सुटी देण्यात ...
औरंगाबाद : जिल्ह्यात रविवारी दिवसभरात ११६ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आणि उपचार पूर्ण झालेल्या ६७ रुग्णांना सुटी देण्यात आली, तर इतर जिल्ह्यांतील एक आणि औरंगाबाद जिल्ह्यातील २ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
जिल्ह्यात एकूण रुगणांची संख्या ४३,३०० झाली आहे. यातील ४१,१७६ रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत, तर एकूण १,१४५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ९७९ रुग्णांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या ११६ रुग्णांत मनपा हद्दीतील ९२, ग्रामीण भागातील २४ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ४६ आणि ग्रामीण भागातील २१, अशा ६७ रुग्णांना सुटी देण्यात आली.
उपचार सुरू असताना पैठण तालुक्यातील पाचोड येथील ९० वर्षीय पुरुष, नवजीवन कॉलनीतील ६५ वर्षीय पुरुष आणि भोकरदन-जालना येथील ९४ वर्षीय पुरुष कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला.
मनपा हद्दीतील रुग्ण
एन-७ सिडको १, मनीषा कॉलनी, अदालत रोड १, मिटमिटा ४, नागेश्वरवाडी १, एन-९, सिडको ५, औरंगपुरा १, कासलीवाल सुवर्णयोग १, सिडको एन-४ येथे ३, छावणी १, खडकेश्वर ३, रेल्वे स्टेशन परिसर ४, गोलवाडी १, पैठण रोड २, आविष्कार सोसायटी १, एन-११, सिडको १, एस.बी.आय. क्वॉर्टर १, नवजीवन कॉलनी, हडको १, हर्सूल सावंगी २, जयभवानीनगर १, विश्रांतीनगरी १, पिसादेवी २, बालाजीनगर १, एन-३, सिडको १, स्वप्ननगरी १, विद्यानगर १, फुलेनगर २, ज्योतीनगर १, उल्कानगरी १, गारखेडा परिसर १, देवानगरी १, पडेगाव १, अजबनगर १, अन्य ४२.
ग्रामीण भागातील रुग्ण
पैठण १, वडगाव कोल्हाटी १, चिंचोली १, सिडको महानगर १, बजाजनगर १, अन्य १९.