१२६ कोरोनाबाधितांची भर, सहा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:04 AM2021-06-18T04:04:26+5:302021-06-18T04:04:26+5:30
२३१ जणांना सुटी : ११७० रुग्णांवर उपचार सुरू औरंगाबाद : सलग तिसऱ्या दिवशी तीन अंकी वाढ सुरूच असून, जिल्ह्यात ...
२३१ जणांना सुटी : ११७० रुग्णांवर उपचार सुरू
औरंगाबाद : सलग तिसऱ्या दिवशी तीन अंकी वाढ सुरूच असून, जिल्ह्यात गुरुवारी १२६ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. सहा बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिवसभरात २३१ जण कोरोनामुक्त होऊन त्यांना सुटी देण्यात आली. त्यात शहरातील २२, तर ग्रामीणमधील २०९ जण घरी परतले असून, १ हजार १७० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १ लाख ४५ हजार १३४ झाली आहे. आजपर्यंत १ लाख ४० हजार ५९७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत ३,३६७ जणांचा मृत्यू झाला असून १,१७० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.
--
मनपा हद्दीत २३ रुग्ण
--
चिंतामणी कॉलनी, सतीश पेट्रोल पंपमागे १, एन-१३ येथे १, म्हसोबानगर ३, जाधववाडी १, एन-९ येथे १, एन-८ येथे १, जयसिंगपुरा १, सुधाकरनगर १, एमजीएम, अन्य १२.
---
ग्रामीण भागात १०३ रुग्ण
--
औरंगाबाद तालुक्यात ३, फुलंब्री ३, गंगापूर ४५, कन्नड १०, खुलताबाद १, सिल्लोड ६, वैजापूर २६, पैठण ८, सोयगाव तालुक्यात १ कोरोनाबाधित बाधित आढळून आले.
---
बाधित सहा ज्येष्ठांचा मृत्यू
---
घाटीत वाघोडी येथील ४८ वर्षीय पुरुष, धानोरा येथील ७५ वर्षीय पुरुष, लोटाकारंजा येथील ५५ वर्षीय पुरुष, खासगी रुग्णालयात मिलकार्नर येथील ७० वर्षीय पुरुष, जिन्सीतील ६४ वर्षीय पुरुष, इंदेगावातील ७१ वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.